crime news  esakal
नाशिक

Nashik Crime News : उसनवारीच्या वादातून मद्याच्या नशेत खून; हत्येचा 12 तासांत उलगडा

सकाळ वृत्तसेवा

पंचवटी (जि. नाशिक) : मेरी वसाहतीत झालेल्या कनिष्ठ लिपिकाच्या हत्येचा उलगडा करण्यास पंचवटी पोलिसांना बारा तासांच्या आत यश आले आहे. या घटनेतील मृताच्या मावस काकानेच मद्यपानानंतर मृताचा चार्जरने गळा आवळून खून केल्याचे उघड झाले आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयित काकाला ताब्यात घेण्यात आले असून, त्याने घटनेची कबुली दिली. निवृत्ती हरी कोरडे (वय ५९, धंदा- शेती, रा. लाखोटी मळा, इंदोरे, दिंडोरी) असे ताब्यात घेतलेल्या मावस काकाचे नाव आहे. (Drunken murder due to Usanwari dispute police Solve murder in 12 hours Nashik Latest Crime News)

जलसंपदा विभागाच्या जलदगती कार्यालयात कार्यरत संतू ऊर्फ संजय वसंतराव वायकंडे (३८, रा. इमारत नंबर सी ४, मेरी कॉलनी, पंचवटी) यांचा सोमवारी रात्री गळा दाबून खून झाल्याचे शवविच्छेदनात उघड झाले होते. पंचवटी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवीत अवघ्या बारा तासांत हत्येचा उलगडा करून आरोपीला ताब्यात घेतले. संशयित कोरडे शेतकरी असून, वायकंडे कोरडेकडून वारंवार किरकोळ रक्कम घेत असत. सोमवारी (ता. ३१) रात्री कोरडे घेवडा विक्रीसाठी पंचवटीतील मार्केट यार्डात आला होता.

त्यानंतर दोघांचा एकमेकांशी संपर्क झाला. दरम्यान, वायकंडे यांची पत्नी लता व त्याची मुले दिवाळीसाठी बाहेरगावी गेल्याने ही संधी साधत दोघे मद्य घेऊन मेरी कॉलनीतील घरी आले. तेथे दोघांनी जेवण केल्यानंतर मद्यपान केले. काही वेळाने दोघांत पैशांच्या कारणातून वाद झाले. वायकंडे यांनी कोरडेला लाथ मारली. त्यानंतर काही काळ दोघांमध्ये वाद झाल्यावर दोघे झोपी गेले असता, कोरडेने मध्यरात्री वायकंडे यांचा चार्जरच्या वायरने गळा आवळून खून केला.

त्यानंतर कोरडे झोपी गेला. सकाळी उठून दिंडोरीकडे रवाना झाला. दरम्यान, पंचवटी पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले असता, त्यात कोरडे येताना व जाताना दिसला. संशयावरून त्याला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने सर्वच घटनाक्रम सांगत गुन्ह्याची कबुली दिली. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रतीक पाटील करीत आहेत.

अवघ्या दोन हजार रुपयांवरून वाद

आरोपी निवृत्ती कोरडे याने मृत संजय वसंतराव वायकंडे यांना तीन ते चार महिन्यांपूर्वी दोन हजार रुपये दिलेले होते. त्याचीच वायकंडे यांच्याकडे मागणी केली असता त्यांच्यामध्ये वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यानंतर निवृत्ती कोरडे याने वायकंडे झोपेत असताना मोबाईल चार्जरच्या वायरने गळा आवळून ठार केले.

यांनी बजावली कामगिरी

पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे, पोलिस उपायुक्त अमोल तांबे, सहाय्यक पोलिस आयुक्त गंगाधर सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे, पोलिस निरीक्षक युवराज पत्की, गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल ढमाळ, पंचवटी गुन्हे शोधपथक सहाय्यक पोलिस निरीक्षक सत्यवान पवार, प्रतीक पाटील, पोलिस उपनिरीक्षक सुनील कासले व गुन्हे शोधपथकाचे अंमलदार यांनी तपासात सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT