stressed student esakal
नाशिक

नाशिक : DT Ed पुनर्परीक्षार्थींना पाचवी संधी नाकारली

खंडू मोरे

खामखेडा (जि. नाशिक) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे (Maharashtra State Examination Council Pune) अंतर्गत डी. टी. एड. (DT Ed) (जुने नाव डी. एड.) अभ्यासक्रमांची २४ मेपासून पुरवणी परीक्षा सुरु झाली आहे. त्यासाठी ऑनलाइन परीक्षा अर्ज (Online Examination Application) भरण्याचे वेळापत्रक परिषदेच्या वतीने जाहीर करण्यात आले होते. परीक्षा अर्ज भरण्याच्या वेळापत्रकांची अधिसूचना जाहीर करताना २०१८- २०१९ या सत्रात प्रवेशित विद्यार्थ्यांना परीक्षेस बसण्याचे परिषदेने नाकारले. त्यामुळे राज्यातील असंख्य विद्यार्थ्यांवर हा व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण करून नोकरी मिळविण्याची संधी हुकली आहे. (DT Ed re examinees denied fifth chance Nashik News)

डी. टी. एड. हा व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना पहिल्यांदा नापास झाल्यानंतर सहावेळा संधी दिली जाते. परंतु, कोरोना प्रादुर्भावाचा काळ असल्यामुळे जून २०२० ची वार्षिक परीक्षा न होता ती जानेवारी २०२१ मध्ये ऑफलाइन झाली. अशाप्रकारे सत्र २०१८- २०१९ मध्ये डी. एड. या व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेशित विद्यार्थ्यांना परिषदेच्या नियमानुसार परीक्षेच्या सहा संधी न मिळता फक्त ४ संधी मिळाल्या. त्यामुळे दोन संधी कमी मिळाल्या. विद्यार्थ्यांना मात्र याची सविस्तर कल्पना देण्यात आलेली नव्हती. त्यामुळे त्यांनी आपल्याला अजून दोन संधी बाकी आहेत, असे समजत परीक्षा शुल्क भरले. पण, ऐन वेळेवर परीक्षा फॉर्म भरला असताना २०१८- २०१९ या वर्षात प्रवेशित विद्यार्थ्यांना परीक्षा परिषदेच्या अधिसूचनेनुसार अपात्र ठरविण्यात आले आहे. त्यामुळे केवळ एक किंवा दोन विषय राहिलेल्या विद्यार्थ्यांना डी. टी. एड. ची पदविका घेण्यापासून कायमस्वरूपी वंचित राहण्याची वेळ आली आहे.

परीक्षा परिषदेच्या या अनाकलनीय धोरणाचा फटका या अगोदरही कित्येक विद्यार्थ्यांना बसला आहे. पाचवी व सहावी संधी नाकारलेल्या विद्यार्थ्यांमध्ये सध्या चिंतेचे वातावरण आहे. अध्यापक विद्यालयाच्या प्राचार्यांनी पुणे परीक्षा परिषद, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्तांनाही त्यांच्यावर झालेल्या अन्यायाची लेखी माहिती दिली. या विद्यार्थ्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करणे गरजेचे असल्याचे पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांनी सांगितले.

"विज्ञान, तंत्रज्ञान, मेडिकल सायन्स या मोठमोठ्या अभ्यासक्रमांच्या ऑफलाइन परीक्षा झाल्या. त्यांना परीक्षेच्या संधीवर संधी उपलब्ध करून देण्यात आल्या. मात्र, डी. टी. एड. या अभ्यासक्रमावर उतरती कळा आली आहे. त्यातही अगदी सामान्य कुटुंबातील विद्यार्थी मोठ्या आशेने प्रवेश घेऊन शिक्षक होण्याचे स्वप्न बघत असतील आणि त्यांच्यावर महामारीच्या काळातही असा अन्याय होत असेल, तर तो अनाकलनीय आहे."

- रोहिदास कोकणी, विद्यार्थी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT