Text Book esakal
नाशिक

Weightless School Bag : पुस्तकाच्या 4 भागांमुळे दप्तर वेटलेस! ‘माझी नोंद’ पानांमुळे अभ्यास करणे सोपे

विजय पगारे

Weightless School Bag : पहिली ते आठवीची मोफत पाठ्यपुस्तके सर्व शाळांपर्यंत पोचली आहेत. शिक्षण विभागाचे सुयोग्य नियोजन, अधिकाऱ्यांची तत्परता आणि शिक्षकांच्या धावपळीतून पुस्तके शाळांना पोच झाली.

शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या स्वागताबरोबरच मोफत पाठ्यपुस्तकेही हाती पडली आहेत. ही सर्व पाठ्यपुस्तके पहिली ते आठवीपर्यंत एकात्मिक पद्धतीने चार भागांत दाखल झालेली पुस्तके विशेष आकर्षण ठरणार आहेत.

यामुळे विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे वजन कमी होण्यास मोठी मदत झाली आहे. दप्तर वेटलेस होण्यास मदत होईल. (Due to 4 parts of book bag become weightless Easy to study with My Note pages nashik news)

गेल्या शैक्षणिक वर्षात पहिलीसाठी चार भागांत पुस्तके तयार झाली. तो प्रयोग यशस्वी झाल्याने आता दुसरी, तिसरी आणि चौथीची पुस्तकेही चार भागांत तयार झाली आहेत. प्रत्येक भागात सर्व विषयांचा समावेश केलेला आहे.

किमान दोन महिने एक भाग वापरता येणार आहे. तेवढा पाठ्यक्रम समाविष्ट आहे. पुस्तकांची सुरेख छपाई, आकर्षक चित्रे आणि मजबूत बांधणी प्रथमदर्शनी दिसून येते.

पालकांना माहिती होण्यास मदत

गेल्या दीड महिन्याच्या सुटीनंतर गुरुवारपासून (ता.१५) सर्व शाळा सुरु झाल्या. यंदा पासून प्रथमच प्रत्येक धड्याच्या शेवटी कोरी पाने वर्ग व गृह पाठासाठी दिली आहेत. त्यामुळे विद्यार्थ्याला प्रत्येक विषयाची स्वतंत्र वही आणण्याची गरज नाही.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

धडा संपताच त्यातील अवघड शब्द, कठीण प्रश्नांची उत्तरे तिथेच लिहिली जाणार असल्याने विद्यार्थ्यांना अभ्यास करणे सोपे जाणार आहे. ही पृष्ठे ‘माझी नोंद’ या शीर्षकाखाली देण्यात आली आहेत. दैनंदिन अभ्यासक्रमाची व अध्ययन अध्यापन प्रक्रियेची पालकांना माहिती होण्यास मदत मिळणार आहे.

असा होईल वापर

एकच पाठ्यपुस्तक शाळेत न्यावे लागेल, नोंदीचा वापर त्याला स्वयं अध्ययनासाठी करता येईल, स्वत:चे मुद्दे विद्यार्थ्यांना काढता येतील, पालकांना वर्गात काय शिकवले आहे हे समजेल, विद्यार्थ्यांना तारीखवार नोंदी कराव्यात.

झालेले प्रश्न लिहिणे, चित्राकृती,चित्र,आलेख, आकृत्या काढण्यासाठी, पाठाला पूरक मुद्दे लिहून ठेवण्यासाठी पाढे तयार करणे, पडताळणी करणे. नावीन्यपूर्ण उपक्रमांची नोंद ठेवणे, इंग्रजीतील शब्दांचे उच्चारण देवनागरी लिपीमध्ये लिहिणे आदींसाठी विद्यार्थ्यांना कोरी पाने वापरता येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Govt of India: भारत सरकारने विकिपीडियाला बजावली नोटीस, केला 'हा' गंभीर आरोप

IPL Auction 2025: CSK vs MI यांच्यात पाच खेळाडूंसाठी रंगणार वॉर! दोन्ही संघ मागे नाही हटणार

Share Market Closing: शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक! सेन्सेक्स 700 अंकांनी वाढला; निफ्टी 24,200च्या जवळ

CJI DY Chandrachud : सरकारविरोधात निकाल म्हणजेच न्यायव्यवस्थेचे स्वतंत्र असे नाही; सरन्यायाधीशांचे खडे बोल

Latest Marathi News Updates live : इतरांकडे असलेल्या चांगल्या गोष्टी पंतप्रधानांना दिसत नाहीत- खर्गे

SCROLL FOR NEXT