पिंपळगाव बसवंत : हिंदू संस्कृतीत एखाद्या व्यक्तीच्या मरणोत्तर पिंडाला शिवून मोक्ष प्राप्त करून देण्यासाठी कावळ्यांचे मोठे योगदान आहे. मात्र, पितृपक्षात पूर्वजांच्या आठवणी व त्यांच्या नैवेद्यासाठी तेवढ्यापुरतेच कावळ्यांचे स्मरण होत आहे.
त्यामुळे मानवी स्वार्थामुळे व बदलत्या वातावरणामुळे कावळ्यांच्या संख्येत घट होत आहे. पितृपक्षात कावळा मिळणे कठीण झाले आहे.
सद्यःस्थितीत पर्यावरणाच्या बदलत्या वातावरणाचा परिणाम कावळ्यांवर झाला असून, कावळा आता ग्रामीण भागातही दिसेनासा झाला आहे. त्यामुळे काव... काव, अशी साद घालूनही न फिरवणारा कावळा दुर्मिळ झाला आहे. (Due to changing environment crow number also decreased in rural areas nashik)
पितृपंधरवड्यात पूर्वजांचे श्राद्ध घातले जाते. श्राद्ध भाद्रपद शुक्ल पौर्णिमा ते आश्विन कृष्ण अमावास्या या पंधरवड्यात केले जाते. हिंदू संस्कृतीत प्रत्येक घटकाला महत्त्वाचे स्थान दिले आहे. प्रत्येक सणावारात निसर्गाला प्राधान्य दिले आहे.
यंदाचा पितृपंधरवडा हा पंधरा दिवसांचाच आहे. २९ सप्टेंबरपासून तर १४ ऑक्टोबरपर्यंत तो आहे. पितृपंधरवड्यात पोळी, भात, भजी, दोन भाज्या, पापडी यांचा नैवेद्य खाण्यासाठी कावळे आवश्यक असतात.
मात्र, वाढत्या निसर्गाच्या हानीमुळे दिवसेंदिवस कावळ्यांची संख्या घटत आहे. त्यामुळे पिंडदान करणाऱ्यांना तासन्तास कावळ्यांची प्रतीक्षा करावी लागत आहे.
एकेकाळी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कावळ्यांचे वास्तव्य असायचे. मात्र, ग्रामीण भागातही कावळे दिसेनासे झाले आहेत. परिणामी, अगदी सहजासहजी ऐकू येणारी कावळ्यांची काव... काव आता लुप्त झाली आहे. त्यामुळे पितृपंधरवड्यात पिंडदान करणाऱ्यांना कावळा दुर्मिळ बनला आहे.
उष्टे शिळे, खरकट्या अन्नावर बिनधास्त ताव मारून गुजराण करीत असल्याने कावळ्याकडे पर्यावरणाचा सफाई कामगार म्हणून पाहिले जाते. दरम्यान, पिकांचे उत्पन्न वाढविण्यासाठी अनेक शेतकऱ्यांकडून रासायनिक खतांचा व औषधांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो.
प्रमाणाबाहेर वाढलेला वापर काही प्रजातीच्या मुळावर आला आहे. त्या पक्ष्यांच्या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. पक्षी पिकांवरील कीड नियंत्रणासाठी मोठी भूमिका बजावत असतात.
त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले मित्र समजून पक्षी संवर्धनासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत, असे मत पक्षी निरीक्षक अनंत (बाळा) सरोदे यांनी व्यक्त केले.
नेमकी का झाली संख्या कमी?
जून महिन्यात पेरणी होती. पेरणी करताना कीटक मातीतून वर येतात. कावळ्यांचे ते अन्न असते. सप्टेंबर, ऑक्टोंबरदरम्यान पीक हाती येते. त्याने खाद्य म्हणून उपलब्ध होतात. मात्र, काही वर्षांपासून शेतीचे क्षेत्र घटले आहे.
कीटकनाशकाचाही वापर वाढला आहे. परिणामी, कावळ्यांना सहजासहजी अन्न मिळणे अवघड झाले. शिवाय झाडांची संख्या कमी झाल्याने त्यांना घरटे करण्यास जागा राहिली नाही. यात प्रदूषण वाढले आहे. या सर्वांचा परिणाम कावळ्यांच्या संख्येवर झाला आहे.
"कावळे बहुतांश वेळेला लिंब, वड अशा देशी झाडांवर घरटे करणे पसंत करतात, पण देशी झाड दुर्मिळ झाली आहेत. चाणाक्ष व हुशारी उपजत असलेल्या कावळ्यांनी स्वतः बदल करून घेत निलगिरीच्या झाडांवर वास्तव करू लागले आहेत. सायखेडा उपबाजार समितीच्या आवारात हा बदल दिसतो."- अनंत सरोदे, पक्षीमित्
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.