Gangapur dam esakal
नाशिक

Nashik Water Crisis: समन्यायी पाणी वाटपामुळे टंचाईची टांगती तलवार! पुरेसा पाऊस न झाल्याचा परिणाम

सकाळ वृत्तसेवा

Nashik Water Crisis : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा निर्माण झाल्याने महापालिका आयुक्तांनी पाणीकपातीचा प्रस्ताव रद्द केल्याने पाण्याबाबत किमान वर्षभर पाण्याची भ्रांत मिटल्याचे वाटत आहे.

मात्र, मराठवाड्याला पाणीपुरवठा करणारे जायकवाडी धरण अवघे ३२ टक्के भरले आहे. गोदावरी ऊर्ध्व खोऱ्यातील समन्यायी पाणीवाटप तत्त्वानुसार जायकवाडी धरणामध्ये ६५ टक्क्यांपेक्षा कमी साठा असल्यास वरच्या धरणांमधून पाणी सोडावे लागणार आहे.

त्यामुळे जायकवाडी धरण भरत नाही, तोपर्यंत नाशिककरांवर पुढील काळात पाणी टंचाईचे सावट कायम राहणार आहे. (Due to equitable distribution of water water scarcity possible Result of insufficient rainfall in Nashik along with Marathwada)

यंदा पावसाला विलंब झाला आहे. जून अखेरीस तुरळक पावसाला सुरवात झाली. जुलै महिन्यात राज्यभर मॉन्सून बरसत असताना नाशिकमध्ये मात्र दमदार पाऊस झाला नाही. त्यामुळे धरणांचे आकडे कागदावर फुगलेले दिसतं असले तरी प्रत्यक्षात पाण्याचे संकट कायम आहे.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर, दारणा व मुकणे धरणात पुरेसा पाणीसाठा आहे. कश्यपी, गौतमीसह गंगापूर धरण समूहात जवळपास ८० टक्क्यांच्या वर पाणी साठा आहे. दारणा धरणातही तेवढाच पाणी साठा आहे.

त्यामुळे शहरात पाणीकपातीचा यापूर्वी ठेवण्यात आलेला प्रस्ताव आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी रद्द केला आहे. त्यामुळे एकीकडे पाण्यासंदर्भात चिंता मिटल्याचे बोलले जात असले तरी मराठवाड्यासह नाशिकमध्ये पुरेसा पाऊस न पडल्याने चिंतेचे वातावरण आहे.

ऑगस्ट महिन्यात पाऊस ओढ देईल, असे संकेत हवामान विभागाने दिले आहे. त्यामुळे राज्याचा विचार करता पाण्याचे संकट कायम आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

संघर्षाची शक्यता

राज्य शासनाने अधिक्षक अभियंता एच. टी. मेंढीगिरी यांच्या अध्यक्षतेखाली पाण्याच्या समन्यायी वाटपासाठी कमिटी गठित केली होती.

कमिटीने मराठवाड्याला पाणीपुरवठा करणारे जायकवाडी धरण ६५ टक्के न भरल्यास वरच्या म्हणजे गंगापूर, दारणा, मुळा, प्रवरा, पालखेड, आळंदी व निळवंडे या धरणातून पाणी सोडावे असे २०१३ मध्ये प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे. नाशिकमधील धरणे सरासरी ६० ते ६५ टक्के भरली आहे, तर जायकवाडी धरण जवळपास ३२ टक्के भरले आहे.

त्यामुळे नाशिकसह मराठवाड्यात पुरेसा पाऊस न पडल्यास समितीच्या अहवालानुसार नाशिक व नगर जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडावे लागणार असल्याने पुरेशा दमदार पावसाची अद्यापही शेती प्रमाणेच धरणक्षेत्रातही आहे. पाऊस न पडल्यास पुन्हा एकदा संघर्षाला सामोरे जावे लागणार आहे.

"समन्यायी पाणी वाटपासाठी दर पाच वर्षांनी अहवाल तयार करणे अपेक्षित आहे. यासंदर्भात चालु अधिवेशनात विधानसभेत मागणी केली आहे. शासनाकडून गांभिर्याने निर्णय घेतला जाईल." - प्रा. देवयानी फरांदे, आमदार, नाशिक.

धरण साठ्याची सद्यःस्थिती

धरण साठा टक्क्यांमध्ये

दारणा ८३.४४

मुकणे ७०

गौतमी ४५.२४

कश्यपी ४३.६६

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : राहुल गांधी आणि नाना पटोले प्रचाराचा नारळ फोडणार

SCROLL FOR NEXT