Ganeshotsav 2022 News esakal
नाशिक

वाजवा रे वाजवा; गणेशोत्सवामुळे रात्री 12पर्यंत ध्वनिक्षेपकास परवानगी

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : यंदाच्या गणेशोत्सवात जिल्ह्यातील सार्वजनिक गणेश मंडळांना सोमवार (ता. ५) ते शुक्रवार (ता. ९) असे सलग पाच दिवस मध्यरात्री बारापर्यंत ध्वनिक्षेपक वाजविण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. याशिवाय नवरात्रोत्सवात दोन दिवस, तर दिवाळी, ईद-ए-मिलाद, ख्रिसमस आणि ३१ डिसेंबर या दिवशीही रात्री बारापर्यंत ध्वनिक्षेपकांना परवानगी असणार आहे. जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी हे आदेश काढले. (Due to Ganeshotsav sound is allowed till 12 midnight Nashik Latest Marathi News)

केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या आदेशान्वये ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक आदींच्या वापराबाबत सूट जाहीर करण्यासाठी जिल्हास्तरावर निर्णयासाठी जिल्हाधिकाऱ्यांना राज्य शासनाद्वारे प्राधिकृत केले आहे. गणेशोत्सवात देखावे पाहण्यासाठी अजून दोन ते तीन दिवस वाढीव परवानगी द्यावी, अशी मागणी पोलिस आयुक्तांसह जिल्हा प्रशासनाकडे होत होती.

त्यानुसार आता जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी अधिकचे तीन दिवस ध्वनिक्षेपक रात्री बारापर्यंत वाजविण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे आता शहरासह जिल्ह्यात पाच दिवस वाजवा रे वाजवा असणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या सुधारित आदेशानुसार ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक यांचा वापर श्रोतृगृहे, सभागृहे, सामूहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यांसारख्या बंद जागांखेरीज इतर ठिकाणी ध्वनीची विहित मर्यादा राखून सकाळी सहापासून रात्री बारापर्यंत असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: धंगेकरांवर रासने यांनी घेतली आघाडी, तिसऱ्या फेरी अखेर कसब्यात उलटफेर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसे शिंदेंच्या लढतीचा आदित्य ठाकरेंना फायदा

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT