Due to lack of rain only 33 percent sowing was done in taluka nashik news  esakal
नाशिक

Nashik Water Shortage : सिन्नर तालुका अजूनही कोरडाठाकच; पावसावर केवळ 33 टक्के पेरणी

In many places in the taluk, the land is plowed and ready and waiting for rain.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Water Shortage : पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामातील पेरणी आणि नगदी पिकांची लागवड लांबली आहे. पाऊस नसल्याने बळिराजा चिंतेत आहे. जुलै महिना संपत येत असताना पावसाने दडी मारल्याने पेरणीपूर्व मशागती झालेल्या जमिनीत पेरणीची कामे थांबली आहेत.

जमिनीत वापसा झाला पण पुरेसा पाऊसच नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. दमदार पावसाअभावी तालुक्यात केवळ 33 टक्के पेरणी झाली आहे.

गतवर्षी आतापर्यंत समाधानकारक पावसामुळे 62 हजार हेक्टरवर म्हणजेच 100 टक्के पेरणी झाली होती. (Due to lack of rain only 33 percent sowing was done in taluka nashik news)

यंदा पाऊस सरासरीच्या तुलनेत केवळ 48 टक्के इतकाच झाला आहे. जूनअखेरीस आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यात तीन-चार दिवस हजेरी लावून पावसाने पुन्हा दडी मारली आहे. तालुक्याच्या पश्चिम भागात अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी येत असल्या तरी दमदार पाऊस नाही. त्यामुळे नदी, नाले कोरडे आहेत.

सिन्नरसह, वडांगळी, मेंढी, देवपूर ,फर्दापूर, धारणगाव, सरदवाडी वडझिरे, ब्राह्मणवाडे, जामगाव, पास्ते, वडगाव-सिन्नर, खापराळे, सोनांबे, कोनांबे, पाटोळे, गोंदे, जयप्रकाशनगर, लोणारवाडी, भाटवाडी, आडवाडी, धुळवाड, चापडगाव, दापूर, कासारवाडी रा भागातील शेतकरी जोखीम पत्करून पेरणी करत आहेत. तुलनेने पश्चिम पट्ट्यातील पांढुर्ली महसूल मंडळात तसेच म्हाळुंगी खोऱ्यात काहीशी पेरणी योग्य स्थिती आहे.

तालुक्यात 62 हजार 113 हेक्टर खरिपाचे सरासरी क्षेत्र असून जुलैपर्यंत अवघ्या २१ हजार हेक्टरवर पेरणी झालेली आहे. अवघ्या 33 टक्के क्षेत्रावर पेरणी झाली असून 14000 हेक्टरवर सोयाबीन तर त्यानंतर मक्याची 3500 हेक्टरवर पेरणी झाली आहे. गतवर्षी जुलै पर्यंत 62 हजार 396 हेक्टरवर पेरणी झाली होती.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सोयाबीनसारख्या पिकाला 80 ते 100 मिमी पाऊस आवश्यक आहे. इतर पिकांसाठीही पुरेशी ओल असल्याशिवाय पेरणी करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

अवघ्या 83 मिमी पावसाची नोंद

तालुक्यात सद्यःस्थितीत सरासरी 83.3 मिमी पाऊस झालेला आहे. सरासरीच्या तुलनेत तो 48.5 टक्के आहे. तालुक्याच्या पूर्व भागात प्रमाण अत्यंत कमी आहे. त्यामुळे चिंतेत भर पडली आहे. डुबेरे महसूल मंडळात सर्वाधिक 138 तर पांढुर्लीत 130 मिमी पाऊस झाला आहे. गतवर्षी जुलैपर्यंत 204 मिमी पाऊस बरसला होता. कोनांबेसह काही धरणे भरली होती. यंदा परिस्थिती अगदी उलट आहे.

14 जुलैपर्यंतचा मंडलनिहाय पाऊस

सिन्नर 62.0

पांढुर्ली 130.6

डुबेरे 138.8

देवपूर 62.9

वावी 55.4

शहा 97.7

"जोखीम पत्करून शेत तयार केले असून पावसाने ओढ दिल्याने दुबार पेरणी करावी लागते का अशी शंका येऊ लागली आहे. कांद्याला भाव नाही, मागील वर्षी सर्व पिके अतिवृष्टीने नास धूस झाल्याने हाती काही लागले नाही. नको देवराया अंत आता पाहू असे वरूणाराजाला म्हणण्याची वेळ आम्हावर आली आहे. शाश्वत पिकांना भाव मिळत नसल्याने बळीराजा सैरभैर झाला आहे." - अक्षय सदाशिव भगत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT