Corona Death Google file photo
नाशिक

पोर्टल अपग्रेडेशनमुळे शहरात वाढतोय मृतांचा आकडा; प्रशासनाची माहिती

विक्रात मते

पंधरवड्यापासून शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत असताना मृत्युदर अधिक वाढत असल्याचे दिसत आहे

नाशिक : पंधरवड्यापासून शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत असताना मृत्युदर अधिक वाढत असल्याचे दिसत आहे; परंतु प्रत्यक्षात मृत्यूची संख्या वाढत नसून यापूर्वी आयसीएमआर पोर्टलवर नोंदणी न केलेल्या रुग्णालयांनी पुन्हा प्रक्रिया सुरू केल्याने मृतांची संख्या पोर्टलवर अधिक दिसत असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली. (due to portal upgradation the number of deaths is increasing in nashik city)

मागील वर्षी कोरोनाचा पहिला रुग्ण ६ एप्रिलला आढळल्यानंतर पालिका प्रशासनाने कोरोनाची माहिती देण्यासाठी पोर्टल तयार केले. पोर्टलवर संबंधित रुग्णालयांना माहिती अपलोड करणे बंधनकारक केले होते. जानेवारीपर्यंत कोरोना परिस्थिती नियंत्रणात येत असताना पोर्टलदेखील अपडेट केले जात होते. परंतु या वर्षी फेब्रुवारीपासून मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या शहरात वाढू लागली. ३२ हजारांपर्यंत रुग्णसंख्या गेल्याने भयावह परिस्थिती निर्माण झाली. यादरम्यान रुग्णालयांना रुग्णसंख्या व मृतांची संख्या आयसीएमआर पोर्टलवर अपलोड करणे बंधनकारक केले, परंतु रुग्णालयाकडून पुरेशी माहिती अपलोड केली नाही. त्यामुळे आयसीएमआर पण पोर्टलवर जेवढी संख्या दर्शविली जात होती, त्यानुसारच मृतांचा आकडा घोषित केला जात होता. गेल्या १५ दिवसांपासून कोरोना परिस्थिती नियंत्रणात येत आहे, मात्र मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. ०.५९ टक्के असलेला मृत्युदर एक टक्‍क्‍यावर गेल्याने लॉकडाउन शिथिल करताना नाशिक रेड झोनमध्ये येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून मृत्यूच्या संख्येचा गोषवारा तयार करण्याचे काम सुरू झाले. त्यातून आयसीएमआर पोर्टल खासगी रुग्णालयातून अपडेट केले जात असल्याने एप्रिल व मे महिन्यात कोविडमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या समोर येत आहे.

मृतांचा आकडा आणखी वाढणार

गेल्या काही दिवसांपासून आयसीएमआर पोर्टलवर माहिती अपलोड केली जात असल्याने त्यातून एप्रिल महिन्यात ३९४, तर मे महिन्यात ३६५ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अद्यापही पोर्टल अपडेट करण्याचे काम सुरू असल्याने मृतांचा हा आकडा वाढण्याची दाट शक्यता आहे

आकडेवारीबाबत अद्यापही संभ्रम

१ ते १६ एप्रिलदरम्यान शहरांमध्ये लाकडावर जाळलेल्या मृतदेहांची संख्या दोन हजार ३०० इतकी नोंदविली गेली. यामध्ये साधारण सतराशे कोरोनाबाधित मृतदेह असल्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र, एप्रिल महिन्यात आयसीएमआर अपडेट पोर्टलवर ३९४ आकडेवारी दिसत असल्याने अद्यापही मृतांच्या खऱ्या आकडेवारीबाबत संभ्रम असल्याचे दिसून येत आहे

खासगी रुग्णालयांना आयसीएमआर पोर्टलवर माहिती अपडेट करणे बंधनकारक केले होते. मात्र, मध्यंतरी रुग्णालयाकडून हलगर्जी झाली. आता रुग्णालयाकडून पोर्टलवर माहिती भरण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढत असल्याचे दिसते.

-डॉ. आवेश पलोड, नोडल अधिकारी, महापालिका

(due to portal upgradation the number of deaths is increasing in nashik city)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: निकालाचे कौल मानण्यास संजय राऊतांचा नकार

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीत उतरले अन् तिरंगी लढतीच्या चक्रव्यूहात अडकले; ठाकरे ब्रँडचं काय होणार?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

Whatsapp Call Recording : मिनिटांत रेकॉर्ड करा व्हॉट्सॲप कॉल, सोपी स्टेप वाचा एका क्लिकमध्ये..

Margashirsha Amavasya 2024: मार्गशीर्ष अमावस्येच्या शुभ मुहूर्तावर करा गंगा स्नान, जाणून घ्या महत्व

SCROLL FOR NEXT