nmc  esakal
नाशिक

NMC News: बदल्यांमुळे अभियंता वर्गात धुसफुस! अभियंत्यांमध्ये दोन गट; महापालिकेतील बदल्यांमध्ये राजकारण

सकाळ वृत्तसेवा

NMC News : पालकमंत्रीपद शाबूत राहिल्याने शिवसेनेचा शिंदे गट खूष असला तरी महापालिकेतील बदल्यांवरून आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिंदे गटाशी दोन हात करण्याची तयारी सुरू झाली आहे.

लक्ष्मी दर्शनानंतर झालेल्या बदल्यांमुळे अभियंता वर्गात धुसफुस सुरू झाली आहे. कार्यकारी अभियंता प्रशांत पगार यांना रोखण्यासाठी आता अभियंत्यांनी लॉबिंग सुरू केले आहे.

परंतु, अभियंत्यांकडून पगार यांना टार्गेट करताना संजय अग्रवाल यांच्याशी मात्र पंगा घेणे टाळले जात असल्याने लॉबिंग करणाऱ्यांमध्येही दोन गट पाहायला मिळाले आहे. (Due to transfers engineering class Two groups among engineers Politics in NMC Transfers nashik)

महापालिकेत पंधरा दिवसांपासून बदल्यांचा सिलसिला सुरू आहे. प्रशासकीय दृष्टीने बदल्यांचे कारण प्रशासनाकडून दिले जात असले तरी या बदल्यांमागे मोठ्या प्रमाणात लक्ष्मीदर्शन झाल्याचे बोलले जात असून, आता त्याला राजकीय किनार असल्याचेदेखील दिसून येत आहे.

राज्यात ट्रिपल इंजिनचे सरकार आहे. भाजप, शिवसेनेचा शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट अशा ट्रिपल इंजिनच्या सरकारमध्ये दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री पदांवरून सुरु असलेली धुसफुस काही प्रमाणात शमविण्यात यश आले.

परंतु नाशिक व रायगड जिल्ह्यातील पालकमंत्री पदावरून वाद आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना नाशिकचे पालकमंत्री पद हवे आहे.

कधी प्रत्यक्ष तर कधी अप्रत्यक्ष त्यांनी संकेतही दिले आहे. पालकमंत्री नसतानाही त्यांच्याकडून अधिकाऱ्यांच्या बैठकांचा सिलसिला सुरू आहे. बैठकांच्या माध्यमातून भुजबळांना नाशिकवर प्रशासकीय पकड ठेवण्यात यश आले आहे.

अधिकारीही राजकारणाच्या अजेंड्यावर

दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री पदाची घोषणा करताना शिंदे सेनेकडे अर्थात सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांच्याकडे पालकमंत्री पद कायम ठेवण्यात आले. त्यामुळे भुजबळ यांनी प्रत्यक्ष नाराजी प्रकट केली नसली तरी त्यांचे समर्थक व पक्षाचे कार्यकर्ते नाराजी व्यक्त करत आहे.

त्या नाराजीचा सुर थेट महापालिकेसह शासकीय अंतर्गत कामकाजात घुसला असून नुकत्याच झालेल्या बदल्यांच्या माध्यमातून शिंदे सेनेसह आयुक्तांशी दोन हात करण्याची तयारी सुरु केली आहे.

पालकमंत्र्यांचा जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसह जिल्हा प्रशासन व सरकारी अधिकाऱ्यांवर नियंत्रण असते. त्यामुळे शिंदे सेनेला खिंडीत पकडण्याची तयारी सुरू झाल्याचे बोलले जात आहे.

त्यामुळे महापालिकेतील बदल्यांमधील राजकारण येत्या काही दिवसात टोकाला जाण्याची शक्यता असून, बदली झालेले अधिकारीदेखील राजकारणाच्या अजेंड्यावर राहणार आहे.

असहकार आंदोलनाची तयारी

अभियंता संवर्गातील बदल्या करताना समान स्वरूपात न्याय मिळाला नसल्याचा आरोप होत असून, त्याविरोधात अधिकाऱ्यांनी प्रशासनाविरोधात असहकार आंदोलन पुकारण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जाते.

शहरातील एका हॉटेलमध्ये त्यासंदर्भात एक बैठक झाली असून, यात नगररचना विभागात कार्यकारी अभियंता पदावर बसण्याच्या तयारीत असलेल्या प्रशांत पगार यांच्याविरोधात लॉबिंग करण्यात आल्याची चर्चा आहे.

अभियंत्यांच्या बदली संदर्भात असहकाराचे अस्त्र उगारताना मात्र नग रचनासह मलनिस्सारण, पाणीपुरवठा विभागाचा अधिक्षक अभियंतापदाचा अतिरिक्त कार्यभार मिळालेल्या संजय अग्रवाल यांच्याविरोधात मात्र नरमाईची भूमिका घेतली गेल्याने अभियंत्यांमध्येही दोन गट पाहायला मिळतं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS Test Series : ऋतुराज गायकवाड पर्थ कसोटीत सलामीला खेळणार? भारत अ संघाच्या २ फलंदाजांना BCCI थांबवणार

स्टार प्रवाहने केली आणखी एका नव्या मालिकेची घोषणा ; 'या' गाजलेल्या हिंदी मालिकेचा आहे रिमेक

गोफण | बॅगा तपासल्या अन् पैसे हरवले

Latest Maharashtra News Updates live : या निवडणुकीत आम्ही बाळासाहेबांच्या विचारांसाठी लढतोय : संजय राऊत

Beed Crime News : जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा पांढरवाडी फाटा येथे ४८ लाखांचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT