Misal Pav News esakal
नाशिक

Nashik News: शहरात ‘मिसळ-पार्ट्या’तून निवडणुकीचा माहौल; निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आजी-माजी नेते लागले कामाला

सकाळ वृत्तसेवा

Nashik News: गेल्या काही वर्षांपासून शहरात होणाऱ्या मिसळ पार्ट्या प्रसिद्धीला आल्या आहेत. अर्थात नाशिकची मिसळ सर्वदूर फेमस आहे. परंतु जसजसे निवडणुकीचा माहौल तयार होऊ लागतो, तसतसा अशा मिसळ पार्ट्याही रंगू लागतात.

दिवाळीचा फराळ संपतो ना संपतो तोच, मिसळ पार्ट्या आता रंगू लागल्या आहेत. या पार्ट्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे आजी-माजी नेते-पदाधिकारी आपल्या कार्यकर्त्यांना ‘रिचार्ज’ करण्यासाठी मिसळ पार्ट्या करू लागल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे. (due to upcoming elections former leaders started working nashik news)

नाशिकच नव्हे तर राज्यातील सर्वच महापालिका, नगरपालिकांच्या निवडणूक प्रलंबित आहेत. तर, नुकत्याच राज्यातील काही ग्रामपंचायतीच्या निवडणूका पार पडल्या आहेत. तसेचही पुढील २०२४-२५ हे वर्ष निवडणुकांचेच असण्याची शक्यता आहे. या वर्षांमध्ये लोकसभा आणि त्यानंतर विधानसभेच्या निवडणूक होऊ घातल्या आहेत.

त्यापूर्वी कदाचित महापालिकेच्याही निवडणूका होण्याची दाट शक्यता आहे. या सर्व शक्यता पाहता, गेल्या गणेशोत्सवापासूनच निवडणुकांसाठी इच्छुक असलेल्या राजकीय पदाधिकाऱ्यांकडून मतदारांपर्यंत पोचण्यासाठी उपक्रम सुरू केले आहेत. नवरात्रोत्सवात गल्ली-बोळात गरबा आणि त्यावर बक्षिसांची लयलूट करणारे उपक्रम अनेकांनी राबविले.

दिवाळीतही इच्छुकांनी आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांना भेटवस्तू व फराळ पाठवून त्यांना थोडासा बूस्टर डोसही दिला. आता दिवाळी आटोपताच निवडणुकांसाठी बाशिंग बांधून असलेल्यांनी मिसळ पार्ट्या सुरू केल्या आहेत.

काही मोजक्या कार्यकर्त्यांना घेऊन सकाळच्या थंडीच्या आल्हाददायक रम्य वातावरणामध्ये शहरातील प्रसिद्ध असलेल्या मिसळच्या ठिकाणी जाऊन ‘मिसळ पें चर्चा’ होऊ लागल्या आहेत. तर काही इच्छुक त्यांच्या उमेदवारीला पाठबळ मिळावे म्हणून पक्षातील वरिष्ठ नेते-पदाधिकाऱ्यांना खूष करण्यासाठी मिसळ पार्ट्या करीत आहेत. काहींनी जर आपापल्या प्रभागातील मोजक्या मतदारांना गटागटाने देवदर्शनासाठी पाठविले जात आहे.

टेबलावर राजकारणाच्या चर्चा

महापालिकेपासून ते विधानसभेसाठी उमेदवारी मिळावी, यासाठी प्रत्येक पक्षात शेकडोनी इच्छुक आहेत. त्यामुळे पक्षाच्या नेत्यांपासून ते मतदारांपर्यंत साऱ्यांना खूष करण्यासाठी इच्छुक आत्तापासून कामाला लागले आहेत. कार्यकर्त्यांच्या मिसळ पार्टीमध्ये आगामी निवडणुकीसाठीची रणनितीचे विषय चर्चिले जात आहेत.

तर, मतदारांच्या मिसळ पार्टीत प्रभागात कसे काम झाले आणि अजून काय करणार अशा विषयांवर मिसळ खात, खात भाषणबाजीच सुरू असते. मात्र, या मिसळ पार्ट्या कितीजणांना लाभदायी ठरतात अन्‌ कितींना झटका देणाऱ्या, हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईलच...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandit Vasantrao Gadgil passed away: ज्येष्ठ संस्कृततज्ज्ञ पंडित वसंतराव गाडगीळ यांचे निधन!

RBI Action: आरबीआयने चार NBFC-मायक्रो फायनान्स कंपन्यांवर केली मोठी कारवाई; कर्ज देण्यावर घातली बंदी

Murder Case : पत्नी, प्रियकराचा खून करून पतीनं उचललं टोकाचं पाऊल..; घरी दोघांचं प्रेमसंबंध कळलं अन्...

PNG Success Story: कुटुंब रस्त्याच्या कडेला विकायचे दागिने आता 47 वर्षांचा सौरभ 192 वर्ष जुन्या कंपनीच्या IPO द्वारे झाला अब्जाधीश

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT