Corona Google
नाशिक

नाशिककर सुधरेनात! 18 हजार बेशिस्तांकडून सव्वा कोटी दंड वसूल

पोलिसांकडून बेशिस्त नागरिकांवर कारवाई सुरू असूनही काही नागरिकांकडून नियमांचे पालन होत नसल्याचे चित्र आहे.

विनोद बेदरकर

नाशिक : दुसऱ्या लाटेतील कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने नागरिकांना मास्कचा (Mask) वापर, सोशल डिस्टन्स (Social Distance), स्वच्छता या त्रिसूत्रीसह वेळेचे बंधन, संचारबंदी(Curfew) , जमावबंदीचे पालन करण्यास सांगितले आहे. मात्र काही नागरिक याकडे दुर्लक्ष करून सार्वजनिक ठिकाणी वावरत असल्याने कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे अशा बेशिस्त नागरिकांवर शहर पोलिस कारवाई करीत आहे.

दुसरी कोरोना (Corona Wave) लाट रोखण्यासाठी नियमांचे पालन न करणाऱ्या शहरातील १८ हजार १२७ बेशिस्त नागरिकांकडून शहर पोलिसांनी एक कोटी दोन लाख २५ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल केला. (During the Corona period fines were collected from 18 thousand citizens who did not follow the rules)

विनाकारण सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्यांवर कारवाई

शहरातील परिमंडळ १ व २ मधील १३ पोलिस ठाण्यांतर्गत पोलिसांनी नाकाबंदी, फिरती गस्त घालून बेशिस्तांवर कारवाई करण्यास सुरवात केली आहे. त्यात गंगापूर, सरकारवाडा, भद्रकाली, आडगाव, म्हसरूळ, पंचवटी व मुंबई नाका पोलिस ठाण्याच्या हद्दीत दहा हजार ३५० बेशिस्तांवर कारवाई करीत ५१ लाख २४ हजार ८०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. यात नऊ आस्थापनादेखील सील करण्यात आल्या आहेत. तसेच उपनगर, नाशिक रोड, देवळाली कॅम्प, अंबड, सातपूर, इंदिरानगर या पोलिस ठाण्याच्या हद्दीत सात हजार ७७७ जणांवर कारवाई करीत त्यांच्याकडून ५१ लाख ९०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई नियमित केली जात असून, बाजारपेठेत जाण्यासाठी नागरिकांना पास देण्यात येत आहे. तसेच आता संचारबंदीच्या काळात विनाकारण सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. खबरदारी म्हणून बाजारपेठेत वाहनांना बंदी आहे. पोलिसांकडून बेशिस्त नागरिकांवर कारवाई सुरू असूनही काही नागरिकांकडून नियमांचे पालन होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग फैलावण्याचा धोका अद्याप आहे.

(During the Corona period fines were collected from 18 thousand citizens who did not follow the rules)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK ची साथ सुटताच Deepak Chahar च्या बहीण अन् पत्नीची स्पेशल सोशल मीडिया पोस्ट; पाहा काय लिहिलंय

Mumbai Local Train: मुंबईमध्ये उद्यापासून १३ नवीन AC लोकल धावणार; गाड्यांची संख्या ९६ वरुन १०६

FIDE World Championship: भारताच्या डी गुकेशचं पराभवानंतर दुसऱ्या फेरीत कमबॅक, लढत ड्रॉ राखण्यात यश

Manoj Jarange Patil: ''एकदा सरकार स्थापन होऊ द्या.. तुम्ही तयारीला लागा'' मनोज जरांगे यांचं मराठा समाजाला आवाहन

ZIM vs PAK: १४६ धावांचे लक्ष्य एकट्याने चोपल्या ११३ धावा! २२ वर्षीय पाकिस्तानी फलंदाजाची हवा

SCROLL FOR NEXT