नाशिक : डिजिटल युगाला कवेत घेतांना प्रत्येक भारतीयाला तंत्रस्नेही व्हायची गरज लपून राहिली नाहीये. हाच धागा पकडत 6 कार्यशाळा घेत दहा-वीस नव्हे तर तब्बल 6 हजार लोकांना वेबसाईट निर्मितीचे शिक्षण देत डॉ. महेश संघवी हे लॉकडाऊन काळातील डिजिटल योद्धा ठरले आहेत.
6 हजार तंत्रस्नेहींना फायदा
डॉ. संघवी हे मूळ पाचोरा येथील असून सध्या ते श्री नेमिनाथ जैन चांदवड संस्थेत प्राध्यापक म्हणून काम बघत आहे. लॉकडाऊन काळात आपल्याकडील कौशल्याचा इतरांना उपयोग व्हावा अन् डिजिटल युगाच्या पर्वात प्रत्येकजण तंत्रस्नेही बनावा या उद्देशाने त्यांनी हा उपक्रम राबविला. डिजिटल युगात प्रत्येक बाब ऑनलाईन झाली आहे, एवढंच काय तर गाईच्या शेणापासून बनवलेल्या गोवऱ्या देखील काही संकेतस्थळांवर विक्रीसाठी आहेत. त्यामुळे व्यवसाय कुठलाही असो संकेतस्थळ ही बाब अनिवार्य ठरत आहे. एका क्लिकवर माहितीच्या मोठ्या विश्वात घेऊन जाण्याची ताकद संकेतस्थळात असते. मात्र संकेतस्थळ अर्थात वेबसाईटची निर्मिती करणे खर्चिक आणि किचकट काम डॉ. संघवी यांनी वर्डप्रेस या मोफत माध्यमाचा वापर करत सोप्पं करून टाकले आहे.
हेही वाचा > "पैसे नाही दिले..तर अंगावर थुंकून कोरोनाबाधित करेन..."अजब धमकीने त्याच्या पायाखालची सरकली जमीन!
संकेतस्थळ निर्मितीचे कौशल्य
लॉकडाउन काळात डॉ. संघवी यांनी सहा ऑनलाईन वर्कशॉप घेऊन साधारणता 6 हजारांहुन अधिक नागरिकांना संकेतस्थळ निर्मितीचे कौशल्य मोफत शिकवले आहे. त्यांच्या स्वतःच्या ब्लॉगला देखील आजपर्यंत जगभरातील नव्वद हजारांहून अधिक लोकांनी भेट दिली आहे व तेथे उपलब्ध असलेल्या नोटस, प्रेसेंटेशन्स व्हिडिओज यांचा उपयोग स्वतःसाठी व व त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी केलेला आहे. पारंपरिक शिक्षण व्यवस्थेला फाटा देत शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी नवनवीन कौशल्य आत्मसात करावी यासाठी ते आग्रही आहेत. डॉ. संघवी यांच्या उपक्रमाचे संस्थेच्या विश्वस्त समितीचे अध्यक्ष बेबीलाल संचेती, उपाध्यक्ष दिनेशकुमार लोढा, झुंबरलाल भंडारी, सुनीलकुमार चोपडा व प्राचार्य महादेव कोकाटे यांनी विशेष कौतुक केले आहे.
हेही वाचा > मरणानंतरही मिळेना मोक्ष... हजारो अस्थीकलश झाडालाच लटकलेल्या अवस्थेत ..कारण वाचून व्हाल थक्क
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.