Earnings of 1 lakh 66 thousand from Cidco swimming pool in just 12 hours esakal
नाशिक

Nashik | अवघ्या १२ तासात जलतरण तलावातून १ लाख ६६ हजाराची कमाई

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : तब्बल दोन वर्षानंतर शहरातील जलतरण तलाव सुरू झाल्याने जलतरण प्रेमीमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. सिडकोतील स्वामी विवेकानंद जलतरण तलावात अवघ्या दोन दिवसातील १२ तासात १ लाख ६६ हजार रुपयांची कमाई झाली आहे.

आश्विन नगर भागात महापालिकेचे स्वामी विवेकानंद जलतरण तलाव आहे. हा तलाव गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे बंद होता. त्यामुळे जलतरणप्रेमींचा पुरता हिरमोड झाल्याचे दिसून येत होते. तर महापालिकेचे आर्थिक उत्पन्न बुडाले होते. परंतु आता सर्वत्रच जलतरण तलाव सुरू झाल्याने तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येते. सिडकोची जलतरण तलावात दोन दिवसात २०० ते ३०० जलतरणप्रेमींनी पोहण्याचा आनंद घेतला. अवघ्या १२ तासांमध्ये १ लाख ६६ हजार रुपयांची उत्पन्नात भर पडली आहे. सुनंदा मालसाणे यांनी येथे व्यवस्थापक म्हणून आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे.

"प्रथम जलतरण तलावाची पूर्णतः स्वच्छता करण्यात आली. त्यानंतर जलतरण तलाव पोहण्यासाठी सज्ज करण्यात आला. नुकतेच महापालिकेकडून कंपाउंड तार बसविल्याने या जलतरण तलावाला चांगली सुरक्षितता प्राप्त झाली आहे. अवघ्या दोन दिवसांमध्ये या ठिकाणी जलतरणप्रेमींनी गर्दी केल्याचे सकारात्मक चित्र दिसून येत आहे."
- बाळू नवले, प्रशिक्षक, स्वामी विवेकानंद जलतरण तलाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: कणकवली मतदारसंघात पहिल्‍या फेरीत भाजपचे नितेश राणे आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: बेलापुरमधून मंदा म्हात्रे आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election 2024: मतमोजणी सुरु होताच नाशिक, जळगावमध्ये अदानी ग्रुपचं खासगी विमान दाखल; नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT