Death News esakal
नाशिक

Nashik News: पूर्व विभागात 3 वर्षाच्या तुलनेत 2021 मध्ये सर्वाधिक मृत्यूची नोंद

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक : पूर्व विभागात गेल्या तीन वर्षाच्या तुलनेत २०२१ वर्षात सर्वाधिक मृत्यू झाल्याची नोंद आहे. या वर्षात कोरोना दुसरी आणि तिसरी लाट असल्याने मृत्यूचे प्रमाण वाढल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. गेली अडीच वर्ष कोरोना प्रादुर्भाव असल्याने पूर्व विभागात सरासरी मृत्यूचे प्रमाण वाढले होते. (Eastern Division recorded highest number of deaths in 2021 compared to 3 years ago Nashik Latest Marathi News)

२०१९ मार्च अखेरपासून देशात कोरोना प्रादुर्भावचा शिरकाव झाला. असे असले तरी शहरात कोरोनाचे प्रमाण कमी होते. जून, जुलैपासून साधारणतः कोरोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण वाढले. मृत्यूचे प्रमाण कमीच होते. २०२० मध्ये कोरोना दुसरी लाट आली. त्या वेळी मात्र कोरोना रुग्णांसह मृत्यूचे प्रमाणही वाढले. दैनंदिन प्रमाण वाढतच राहिले. त्यामुळे दैनंदिन शंभरहून अधिक मृत्यूची नोंद होऊ लागली.

त्यात पूर्व विभागीय कार्यालयात होणारी नोंद अधिक होती. दरम्यान, तिसऱ्या लाटेसही सुरवात झाल्याने मृत्यूच्या प्रमाणात आणखीन भर पडली. सरासरी दैनंदिन आलेल्या मृत्यूच्या आकडेवारीची नोंद करण्यात आली. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२१ चा विचार केला तर सुमारे १ हजार ३०० ने मृत्यूचे प्रमाण वाढले. या संपूर्ण वर्षभरात ४ हजार ६७५ मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यापाठोपाठ २०२० मध्ये ३ हजार २७५ अशी नोंद होती.

हेही वाचा : आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....

२०१९ सह चालू २०२२ अशा दोन वर्षात मृत्यू होण्याचे प्रमाण कमी असल्याचे नोंदणीत आढळून आले. सरासरी २०१९ ते २०२२ अशा चार वर्षाच्या मृत्यू दराची आकडेवारी लक्षात घेतली. २०२१ वर्ष वगळता इतर तीन वर्षात फार जास्त तफावत नाही. असे असले तरी २०२१ वर्षातील सर्वच मृत्यू कोरोनानेच झाले असे म्हणणे चुकीचे ठरेल. नैसर्गिक आणि इतर आजाराने मृत्यू झालेल्यांचे प्रमाणाचादेखील त्यात समावेश होते. अनेकांचा मृत्यू कोरोनाची धास्ती घेऊनदेखील झाला आहे. त्यांचाही यात समावेश आहे.

मृत्यू दराची वर्षनिहाय आकडेवारी

वर्ष मृत्यू नोंद

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१९ २ हजार ९०

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२० ३ हजार २७५

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२१ ४ हजार ६७५

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२२ २ हजार ३६१ (२९ नोव्हेंबरपर्यंत)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT