road Construction Fund esakal
नाशिक

Nashik News: निफाड तालुक्यातील 22 गावांतील वाडी वस्त्यांवरील वाट सुकर! गिते व कदमांच्या प्रयत्नांना यश

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : निफाड तालुक्यातील गावांसाठी रस्ता रुंदीकरण,विस्तारीकरण, डांबरीकरण काँक्रिटीकरण कामासाठी आमदार अनिल कदम, स्थायी समिती सभापती गणेश गीते, पिंपळगाव बाजार समिती माजी संचालक गोकुळ गीते यांच्या प्रयत्नातून व ग्राम विकास मंत्र्याकडे केलेल्या पाठपुराव्यातून तब्बल साडे सात कोटी निधी मिळविण्यात त्यांना यश मिळाले आहे.

त्यामुळे निफाड तालुक्यातील २२ गावच्या रहिवाशी वस्त्यावरील रस्त्याचा "मार्ग" सुकर होणार आहे. (Easy access to wadi settlements in 22 villages of Niphad taluka Success to efforts of Gite and Kadam Nashik News)

अनिल कदम माजी आमदार असले तरी नागरिकाच्या मागण्या तक्रारी सोडविण्यासाठी सदैव प्रयत्नशील असतात. निफाड तालुक्यातील पिंपळस रामाचे करंजगाव, भुसे, सोनगाव, औरंगपूर, मोजे सुकेने, मुखेड, कोकणगाव, दीक्षि, कारसूळ, आहेरगाव, पालखेड, लालपाडी, दारणासांगवी, वर्धेदारणा, चितेगाव, सुळेवाडी, सोनेवाडी, गोंडेगाव, महाजनपूर, शिंगवे, तळवाडे, पिंपळगाव, ओने, बेहड, तारू खेडले या गावांमधील बऱ्याच वस्त्यावरील रस्त्याचे काम झालेली नव्हते.

त्याच प्रमाणे दशक्रिया विधी , शाळेच्या वॉल कंपाऊंड मोकळा जागेत फ्लेव्हर ब्लॉक बसवणे सिमेंट काँक्रीटचे रस्ते, स्मशानभूमी निवाराशीड आदी कामे होणे बाबत मागणी वाढली होती.

आमदार कदम यांच्या सह निफाड तालुक्यातील शिंगवे येथील भूमिपुत्र नाशिक शहर स्थित माजी स्थायी समिती सभापती गणेश गीते व पिंपळगाव बाजार समितीचे माजी संचालक गोकुळ गीते यांनी गरज असलेल्या विकास कामांबाबत चर्चा केली.

सदर कामांना प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सतत पाठपुरावा केला. निफाड तालुक्यासाठी तब्बल साडेसात कोटीचा भरीव निधी आणण्याचे काम आमदार कदम व गीते बंधूंनी केले आहे.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

याबाबत तालुक्यातील नागरिकांना ही बाब समजताच आमदार कदम गोकुळ गीते यांचे आभार मानले. यातून राजकारणा पेक्षा समाजकारणाला अधिक महत्व दिले जाते हे गीते बंधूंनी पुन्हा एकदा दाखवुन दिले आहे.

'शिंगवे' साठी पावणेदोन कोटी रुपये निधी

"जनसामान्यांच्या प्रश्न सोडविणे हे माझे कर्तव्य आहे. शिंगवे येथील बरेचशे शिव रस्ते मजबुतीकरण बाकी होते.तसेच स्मशानभूमीत निवारा शेड आवश्यक असल्याचे निदर्शनास आले होते.याबाबत ग्रामस्थांनी सदर प्रश्न मार्गी लावण्यासाठी विषय घेतला होता. त्या अनुषंगाने आमदार अनिल कदम बंधू गणेश गीते यांच्या प्रयत्नातून जवळपास निफाड तालुक्यासाठी साडे सात कोटी रुपये निधी आणला यातील १ कोटी ७० लाख रुपये हा शिंगवे गावांसाठी आणण्यात यश मिळाले."

- गोकुळ गीते, माजी संचालक पिंपळगाव बाजार समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT