tensed farmer esakal
नाशिक

Summer Season : उन्हाच्या तीव्रतेने शेतकऱ्याचे अर्थचक्र कोलमडले

पालेभाज्यांची गुणवत्ता टिकवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

हर्षवर्धन बोऱ्हाडे

Summer Season : उन्हाची तीव्रता वाढली असून एप्रिलमध्येच नाशिक तालुक्यात ३९-४० अंश तापमान पोहोचल्याने भाजीपाला पिके सुकू लागली असून विहिरींनी तळ गाठला आहे. नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांनी लावलेली भाजीपाल्याची पिके आता सुकत असल्यामुळे पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे.

नाशिक जिल्ह्यातील १५ तालुक्यातील अनेक भागात पाणीटंचाई आणि उन्हाची तीव्रता असल्यामुळे हिरवी पिके सुकू लागले आहेत. म्हणून शेतकऱ्यांना आता पाणी आणि वाढत्या तापमानाचे धोके जाणवत आहे. (economic cycle of farmer collapsed due to intensity of Summer Season nashik news)

गेल्या काही दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने थैमान घातले होते. त्यामुळे विषम वातावरणाची अनुभूती घेतली. मात्र एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून उन्हाळा अधिक तीव्र होत असून तापमानात उच्चांकी वाढ झाली आहे.

संपूर्ण परिसरात उष्णतेची लाट पसरलेली असताना त्याचा सर्वाधीक फटका ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना बसत आहे. ज्यांच्याकडे विहिरी आहे व उन्हाळ्यातही पाणी टिकून असायचे असे शेतकरी कोथिंबीर कांदापात, मेथी, शेपू, काकडी, दोडके, भेंडी, भोपळा, गिलके, ढोबळी मिरची, कोबी, टोमॅटो, फ्लॉवर ची लागवड करतात.

त्यासाठी रात्रीचा दिवस करताना पहाटे पाणी भरण्यासाठी जागरण करणारे शेतकरी वाढलेल्या उष्णतेने त्रस्त होत आहेत. शेतात कसेबसे पाणी दिल्यानंतर ३ ते ४ तासांतच पीक सुकत असल्याने पाणी किती वेळा द्यावे, हा प्रश्न आता शेतकऱ्यांपुढे उभा राहिला आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

नाशिक जिल्ह्यात असणाऱ्या १५ तालुक्यात अनेक भागात सध्या हीच परिस्थिती आहे. नाशिकच्या ग्रामीण भागात शिंदे-पळसे, जाखुरी, झाडेगाव, सामनगाव, मखमलाबाद ते गिरनारे या भागात सध्या हीच परिस्थिती आहे.

"आधीच उन्हाच्या झळांनी घायाळ झालेला बळीराजा पिकाच्या लागवडी इतकेही उत्पन्न निघत नसल्याने नैराश्याच्या खाईत लोटला जात आहे. नाशिक जिल्हा व तालुक्यांमध्ये धरणे असूनही संपूर्ण तालुके बागायती झाले नाही. पूर्व भागातील विहिरींना एप्रिलपर्यंत पाणी टिकत असताना यंदा ते घटले आहे." - साहेबराव खर्जुल

"भूजल साठा कमी होत असल्याने शेतकऱ्याच्या तोंडचे पाणी पळाले आहे. उन्हाळ्यात हमखास भाव मिळेल या उद्देशाने काही भागातील शेतकऱ्यांनी कपड्याचा मांडव तयार करून उन्हापासून शेतमाल बचावाचा प्रयत्न सुरू केला आहे. परंतु अशा मांडवांना उष्णता सहन होत नाही व त्याखालील पिके गळत आहेत. पिकाला हमीभाव मिळत नाही. शेतकऱ्यांची खरी व्यथा कोणी समजून घेत नाही." - आत्माराम दाते, शेतकरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतांच्या मोजणीला सुरुवात; हडपसर मधून चेतन तुपे आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: डोंबिवलीत रवींद्र चव्हाण आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT