Nashik Rain Update : तालुक्यात वरुणराजा रुसल्याने अर्थकारण विस्कळित झाले आहे. पावसाअभावी शेतकरी हवालदील झाला असून जोरदार पावसाची प्रतिक्षा करीत आहे. पाऊस नसल्याने नदी काठच्या विहिरी वगळता अन्यत्र विहिरींनी तळ गाठला आहे.
जुलै अंतिम टप्प्यात आला असताना २० टक्के क्षेत्राला पेरणीची प्रतिक्षा आहे. पुरेसा पाऊस न झाल्याने बियाणे, खते, औषधे पडून आहेत.
तालुक्यातील २० हजार ८५६ लोकसंख्या असलेल्या १० गावे, ८ वाड्या अशा १८ ठिकाणी १३ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु आहे. (economy has been disrupted due to no rain in malegaon nashik news)
टँकरद्वारे पाणीपुरवठ्याला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे प्रांताधिकारी नितीन सदगीर, तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी सांगितले.
तालुक्यात सरासरी १०१.५५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी सुमारे १७५ मिलिमीटर पाऊस झाला होता. कळवाडी, माळमाथा व सौंदाणे मंडळ वगळता अन्य दहा मंडळात पाऊस नाही. तालुक्यातील ९५ हजार २७८ पैकी ७२ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. पेरणीची टक्केवारी ७५ टक्के असली तरी यात कळवाडी, सौंदाणे मंडळ व गिरणा, मोसम नदी काठावरील गावांचा समावेश आहे. अद्यापही २३ हजार हेक्टर क्षेत्रात पेरणी बाकी आहे.
प्रामुख्याने मका व कापूस लागवड मोठ्या प्रमाणावर झाली आहे. ३४ हजार ३४९ हेक्टर क्षेत्र मका तर २१ हजार ६४६ हेक्टर क्षेत्र कापसाचे आहे. ज्वारी लागवड वाढली आहे. ज्वारीसाठी ३२० हेक्टर क्षेत्र अपेक्षित असताना प्रत्यक्षात साडेचारशे हेक्टरवर ज्वारीची पेरणी झाली. बाजरीच्या क्षेत्रात मोठी घट झाली आहे. सोयाबीनचे क्षेत्रही अपेक्षेपेक्षा वाढले आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
तालुक्यातील लघु व मध्यम प्रकल्पांमध्ये अत्यल्प पाणीसाठा आहे. गिरणा धरणात अवघा १९ टक्के (३ हजार ५५७ दशलक्ष घनफूट ) पाणीसाठा आहे. आगामी काळात चाऱ्याचा प्रश्न गंभीर होण्याची भीती आहे. बाजारपेठेत तुरळक ग्राहक येत आहेत. अधिक मासामुळे बाजारपेठेत तुरळक खरेदी होत असल्याचे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ओम गगराणी यांनी सांगितले. सोने, चांदी, चैनीच्या वस्तूंची खरेदी ठप्प झाली आहे. आवक घटल्याने भाजीपाल्याचे दर वाढले आहेत.
- २३ हजार हेक्टर क्षेत्रात पेरणी बाकी
- कृषी निविष्टा दुकानांत खते, औषधी शिल्लक
- शेतकऱ्यांना पशुधन व चाऱ्याची चिंता
- खरीप हंगाम लांबल्याने उत्पादनात घट होणार
- शेवगा, टोमॅटो व दूध विक्रीवर निवडक शेतकऱ्यांची गुजराण
- कर्जासाठी शेतकरी बँका, सुवर्णकारांच्या दारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.