Suraj Mandhare esakal
नाशिक

Nashik News : शिक्षणाधिकाऱ्यांच्‍या चौकशीचे ‘एसीबी’ ला पत्र

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : राज्‍यातील ३६शिक्षणाधिकाऱ्यांची चौकशी करण्याचे पत्र शिक्षण आयुक्‍त सूरज मांढरे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिलेले आहे.

नुकताच नाशिकसह राज्‍यात भ्रष्टाचार प्रकरणात जाळ्यात काही अधिकारी सापडल्‍यानंतर आयुक्‍त मांढरे यांनी यासंदर्भात कार्यवाही करताना पत्र लिहिले आहे. (Education Commissioner Suraj Mandhare has given letter to Anti Corruption Department to investigate 36 education officials in state nashik news)

नाशिक महापालिकेत कार्यरत शिक्षण विभाग प्रशासनाधिकारी सुनीता धनगर यांना लाच स्वीकारताना अटक केल्‍यानंतर त्‍यांच्‍याकडे कोट्यवधी रुपयांचे गभाड सापडले आहे. तसेच राज्‍यातील विविध घटनांमध्ये शिक्षणाधिकारी स्‍तरावरील अधिकारी संशयाच्‍या भोवऱ्यात आहेत.

या पार्श्वभूमीवर शिक्षण आयुक्‍त सूरज मांढरे यांनी भ्रष्टाचाराला लगाम लावण्याच्‍या उद्देशाने राज्यातील ३६ शिक्षणाधिकाऱ्यांची चौकशी करण्याचे पत्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिले आहे. शिक्षण विभागात मोठा भ्रष्टाचार सुरू असल्याने आयुक्तांनी ‘एसीबी’ ला पत्र लिहिले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

शिक्षण क्षेत्रातील अनेकांकडून शिक्षण क्षेत्रात बदलीसाठी होत असलेला भ्रष्टाचार उघड करण्याची मागणी होत आहे. शिक्षण विभागात मोठा भ्रष्टाचार सुरू आहे. अधिकारी लाच घेताना पकडले जातात मात्र पुन्हा सेवेत येतात, पुन्हा भ्रष्टाचार करतात, पण कारवाई होत नाही.

त्यामुळे आयुक्त सूरज मांढरे यांनी पत्र लिहिल्‍याची माहिती समोर येते आहे. ज्या शिक्षकांवर छापे पडले त्यांच्यावर खुली चौकशी करण्याची मागणी या माध्यमातून केलेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतांच्या मोजणीमध्ये अजित पवारांनी घेतली आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: विक्रोळीत सुनील राऊत आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT