NMC News : राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने नुकत्याच केलेल्या बदल्यांमध्ये नाशिक महापालिकेसाठी मुंबई दक्षिण विभागाचे शिक्षण निरीक्षक कार्यालयातील शिक्षण उपनिरीक्षक भिकनचंद ताराचंद पाटील यांची शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारीपदी नियुक्ती केली आहे.
नाशिक महापालिकेच्या प्रशासन अधिकारी सुनीता धनगर यांना ५० हजार रुपयांची, तर लिपिक नितीन जोशी याला पाच हजार रुपयांचे लाच घेताना पकडल्यानंतर दोघांनाही पोलिस कोठडी देण्यात आली. (Educational Administration Officer Appointment of Bhikanchandra Patil in nmc nashik news)
त्यानंतर शिक्षण विभागाने दोघांनाही निलंबित केले. श्रीमती धनगर यांच्याकडील पदभार तात्पुरत्या स्वरूपात पंचायत समितीच्या डॉ. मिता चौधरी यांच्याकडे सोपविण्यात आला. गेल्या महिन्याभरापासून ते या पदाचा कार्यभार सांभाळत आहे.
परंतु त्यांच्याकडे आधीच पंचायत समितीसह शासकीय कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापक व शालेय पोषण आहाराचा कार्यभार असल्याने महापालिका हा त्यांच्याकडे चौथा कार्यभार आला होता. त्यामुळे त्यांनी स्वतःच शासनाकडे विनंती करून महापालिकेच्या पदापासून मुक्त करावे, अशी विनंती केली होती. दरम्यान, शालेय शिक्षण विभागाने राज्यात ६४ बदल्या केल्या.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
त्यात नाशिक महापालिकेसाठी पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पाटील हे मुंबईच्या दक्षिण विभागातील शिक्षण निरीक्षक कार्यालयात शिक्षण उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहे. १ जुलैपासून ते महापालिकेच्या प्रशासन अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारतील.
नाशिक विभागामध्ये माध्यमिक विभागाचे वेतन व भविष्यनिर्वाह निधी पथकाचे अधीक्षक उदय देवरे यांची माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात शिक्षण उपनिरीक्षक पदावर बदली करण्यात आली आहे, तर वेतन व भविष्यनिर्वाह निधी पथकातील प्राथमिक विभागाचे अध्यक्ष गणेश रामचंद्र फुलसुंदर यांची माध्यमिक विभागाच्या वेतन व भविष्यनिर्वाह निधी अधीक्षक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
दोन्हीही बदल्या या वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे. अनेक वर्षांपासून त्याच पदांवर देवरे व फुलसुंदर यांच्यात ‘खो-खो’ सारखा खेळ सुरू असल्याचे बोलले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.