Jalaj Sharma esakal
नाशिक

Mission Indradhanush 5.0: ‘विशेष मिशन इंद्रधनुष 5.0’ मोहीम प्रभावी राबवा; जिल्हाधिकारी जलज शर्मा

सकाळ वृत्तसेवा

Mission Indradhanush 5.0 : बालकांमधील मृत्यू व आजारपणाचे प्रमाण कमी करण्यासाठी लसीकरण हे एक प्रभावी साधन असल्याने केंद्र सरकारने ऑगस्ट २०२३ पासून तीन फेऱ्‍यांमध्ये सर्व जिल्हा, महानगरपालिकांमध्ये ‘विशेष मिशन इंद्रधनुष ५.०’ कार्यक्रम हाती घेतला आहे.

या कार्यक्रमाची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिल्या आहेत. (Effectively implement Special Mission Indradhanush 5 campaign Collector Jalaj Sharma nashik news)

जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आयोजित जिल्हा समन्वय समिती बैठकीत जिल्हाधिकारी शर्मा बोलत होते. या वेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे, जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहते, जागतिक आरोग्य संघटना नाशिक मंडळाचे एस. एम. ओ. डॉ. प्रकाश नांदापूरकर यांच्यासह संबंधित विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

जिल्हाधिकारी शर्मा म्हणाले, की अर्धवट लसीकरण झालेले किंवा लसीकरण न झालेल्या बालकांची प्रतिकारशक्ती ही पूर्ण लसीकरण झालेल्या बालकांपेक्षा कमी असते. त्यामुळे ते लवकर आजारी पडतात किंवा मृत्यू पावतात.

त्या अनुषंगाने केंद्र सरकारने डिसेंबर २०२३ पर्यंत गोवर रुबेला आजाराचे दूरीकरण करण्याचे ध्येय निश्चित केले आहे.

त्‍यासाठी केंद्र सरकारने ऑगस्ट २०२३ पासून तीन फेऱ्‍यांमध्ये सर्व जिल्हा, महापालिकांमध्ये हाती घेतलेल्या ‘विशेष मिशन इंद्रधनुष ५.०’ मोहिमेची जिल्ह्यात अंमलबजावणी करताना कोणीही बालक अथवा गरोदर माता वंचित राहणार नाही, यासाठी आवश्यक नियोजन करावे. त्याचप्रमाणे या मोहिमेबाबत जनजागृतीही करावी, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मोरे यांनी मोहिमेबाबत माहिती देताना मोहिमेत लसीकरणपासून पूर्णपणे वंचित राहिलेल्या किंवा अर्धवट लसीकरण झालेल्या ० ते ५ वर्षे वयोगटातील सर्व बालक व गरोदर मातांचा आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, नर्सिंग स्टाफ यांच्यामार्फत घरोघरी जाऊन सर्व्हे करण्यात आला आहे.

शिल्लक राहिलेल्या गरोदर माता व बालकांचे लसीकरण या मोहिमेंतर्गत करण्यात येणार असल्याचे सांगितले.

मोहिमेचे असे आहेत टप्पे

या मोहिमेचा पहिला टप्पा ७ ते १२ ऑगस्ट, दुसरा टप्पा ११ ते १६ सप्टेंबर आणि तिसरा टप्पा ९ ते १४ ऑक्टोबर २०२३ या तीन टप्प्यांत मोहीम राबविण्यात येणार आहे. तसेच, या मोहिमेच्या लसीकरण सत्राचे नियोजन शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांत केले जाईल.

सर्व सत्रे ही यु-विन ॲपवर करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. नेहते यांनी दिली. डॉ. नांदापूरकर यांनी या वेळी विशेष मिशन इंद्रधनुष ५.० व नियमित लसीकरणाबाबत प्रास्ताविक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित शहांनी केले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे अभिनंदन

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: भाजपचे शिवाजी कर्डिले १४९८४ मतांनी आघाडीवर.

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT