Humanity : आजही धर्मांध भिंती पलीकडून एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे, एकमेकांच्या धार्मिक अधिष्ठानाप्रती आस्था बाळगणारे अनेक लोक ठिकठिकाणी आपणाला आढळतात.
त्यातीलच एक ठिकाण म्हणजे ऐतिहासिक गाव असलेले चांदोरी. अजान व भजन दोन्ही समुदायातील नागरिक तितक्याच श्रद्धेने करतात. ही या गावाची भक्तिमय ओळख आहे. (Eid e Milad procession on second day of Anant Chaturdashi Historic decision of Muslim community members in Chandori nashik)
आपण अनेकदा पाहतो, की काही स्वार्थी लोक आपला केवळ स्वार्थ साधण्यासाठी समाजामध्ये तेढ निर्माण करत असतात. हिंदू-मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करणारे आपण अनेकजण पाहतो.
मात्र, या सर्व गोष्टींचा चांदोरी येथील ग्रामस्थांना कोणतीही बाधा होत नाही. कारण येथील लोक एकमेकांसोबत एकमेकांच्या धर्माचा आदर करून गुण्यागोविंदाने राहतात.
महाराष्ट्रात सर्वांना प्रिय असलेला गणेशोत्सव येत्या १९ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. गणेशोत्सवाचे १० दिवस मुंबईसह राज्यात मोठा उत्साह असतो. यंदा अनंत चतुर्दशी २८ सप्टेंबरला आहे.
त्याचदिवशी मुस्लिम बांधवांची ईद ए मिलाद आहे. हिंदू आणि मुस्लिम दोघांसाठी २८ सप्टेंबरचा दिवस महत्त्वाचा आहे. गणेश चतुर्थीपासून मनोभावे गणपती बाप्पाची पूजा, आराधना केली जाते. अनंत चतुर्दशीच्या दहाव्या दिवशी राज्यभरात गणेश विसर्जन मिरवणुका निघतात.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
मोठ्या संख्येने भाविक रस्त्यावर उतरतात. शहरात विसर्जन मिरवणुकीचा मोठा उत्साह असतो. मोठी गर्दी रस्त्यावर असते. हीच बाब लक्षात घेऊन चांदोरीतील मुस्लिम समुदायाने ईद ए मिलाद मिरवणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
चांदोरीतील मुस्लिम बांधव शुक्रवारी (ता. २९) ईद ए मिलाद साजरी करणार आहेत. धार्मिक सहिष्णुता आणि सलोख्याच्या दृष्टीकोनातून हा निर्णय घेतला आहे.
"गणेशोत्सव हा आमच्या हिंदू बंधूंचा सण आहे. १० दिवस हा उत्सव असतो. शेवटच्या दिवशी गणेश विसर्जन मिरवणुका निघतात. त्यामुळे ईद मिलाद उन नबीची मिरवणूक २८ सप्टेंबरऐवजी २९ सप्टेंबरला काढण्याचा निर्णय घेतला आहे."
-मौलाना शहाबुद्दीन रजवी, मुश्ताक इनामदार, मुस्लिम पंच कमिटी, चांदोरी
"चांदोरी गावची असलेली शांततामय ओळख या निर्णयाने जपली जाणार आहे .मुस्लिम बांधवांचा हा निर्णय कौतुकास्पद आहे."-सिद्धार्थ वनारसे, संस्थापक, आदर्श युवा प्रतिष्ठान, चांदोरी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.