नाशिक

Historical Inscription: लाखलगावाच्या घाटावर अठराव्या शतकातील ‘शिलालेख'! सरदार अप्पाजी वैद्य यांचा इतिहास

आनंद बोरा

Historical Inscription : छत्रपती संभाजीनगर मार्गावरील नाशिकपासून तीस किलोमीटर अंतरावरील लाखलगाव-रामाचे हे गाव. इथल्या गोदावरी नदीच्या घाटाच्या तटभिंतीवरील शिलालेख अठराव्या शतकातील आहे.

पुण्यातील वीरगळ अभ्यासक अनिल दुधाणे यांनी त्याचा अभ्यास केला. शिलालेखाची भाषा उठाव स्वरुपातील देवनागरी आहे. वास्तूशास्त्राचे अभ्यासक अप्पाजी गणेश वैद्य यांचा गावातील हा इतिहास थक्क करणारा आहे. (Eighteenth century inscription on Lakhalgaon Ghat History of Sardar Appaji Vaidya nashik news)

दक्षिण-उत्तर वाहणाऱ्या गोदावरीच्या बाजूला महादेव, सिद्धेश्‍वर, संत जनार्दन स्वामी, खंडेराव, लक्ष्मी माता, मारुती, वेताळ बाबा, शंकर अशी मंदिरे आहेत. मंदिरालगतच्या समाधी लक्ष वेधतात. ओतूरच्या श्री संत सदगुरू दिगंबर बापू महाराज यांची ही तपोभूमी आहे.

त्यांची समाधी आहे. त्यांनी गावातील रामाचे मंदिर स्थापन केले. शनी मंदिराच्या बाजूला असलेल्या सिद्धेश्‍वर मंदिरात संत जनार्दन स्वामींचे वास्तव्य होते. नदीवरील घाटाच्या पायऱ्यांमध्ये विविध मूर्तींसह शिलालेख आहे.

शिलालेख कोरीव असून सात ओळींचा मजकूर त्यावर लिहिलेला आहे. शिलालेखास रंग नसल्याने आणि पाण्याच्या प्रवाहामुळे अक्षरे स्पष्ट दिसत नाही. छत्रपती थोरले शाहू महाराज (सातारा) आणि पेशवे बाळाजी विश्‍वनाथ यांच्या कारकिर्दीत हा घाट बांधला गेला.

शिलालेखामध्ये लक्ष्मण कृष्णा, शिवराम कृष्णा फाटक अशी नावे आहेत. या दोघांनी त्यांच्या संपत्तीच्या हिश्‍यातून शके १६६३ मध्ये हा घाट बांधल्याचा उल्लेख आढळतो.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

ऐतिहासिक माहिती

माधवराव पेशवे यांचे साडू सरदार अप्पाजी गणेश वैद्य यांना १७७२ मध्ये गावातील वैद्य वाडा जहागिरीमध्ये मिळाल्याचे गावातील त्यांचे वंशज सुरेश वैद्य सांगतात. इथे त्यांनी मंदिरे बांधली. गावाला साठ बिगे जमीन दिली.

अप्पाजी वैद्य हे अहमदाबादला सुभेदार होते. पेशव्यांनी त्यांना लखनाबादची जहागिरी दिली होती. अहमदाबादहून येताना त्यांनी संपत्ती आणली होती. १७७२ च्या दरम्यान, अप्पाजी लखनाबादला आले.

अप्पाजी वास्तूशास्त्राचे अभ्यासक असल्याने त्यांनी नवीन लाखलगावची रचना वास्तूशास्त्राप्रमाणे केली. सुरक्षेसाठी तटबंदीचा कोट गावाभोवती उभारली. त्याला चार वेशी आहेत.

अप्पाजी यांचा मुलगा सरदार अमृतराव वैद्य हे लढवय्ये होते. कल्याणचा सुभा लुटताना सैन्यात चांगली कामगिरी केल्याने त्यांना जहागिरी मिळाली. अमृतराव यांचा मुलगा माधवराव व माधवराव यांचा मुलगा अप्पाजी धार्मिक वृत्तीचे होते, अशीही माहिती श्री. सुरेश वैद्य यांनी दिली.

शिलालेखाचे वाचन

शके १६६३ दुर्मती

नाम सवत्सरे मार्ग-

शीर्ष सुध १ तदि-

ने श्री गंगा चरणी ल-

क्ष्मण कृष्णा तत्पर शि-

वराम कृष्णा फाटक

निरंतर श्रुभवतु (न)

अर्थात, शालिवाहन शके १६६३ मध्ये दुर्मती नाम संवत्सरात गंगा गोदावरी चरणी तत्पर असलेले श्री लक्ष्मण कृष्णा, शिवराम कृष्णा फाटक यांनी गोदावरीच्या तीरी मार्गशीर्ष शुद्ध एकादशीच्या दिवशी म्हणजे शनिवारी २८ नोव्हेंबर १७४१ रोजी घाट बांधला. बांधकामे केली. अथवा त्याचा जीर्णोद्धार केला.

"लाखलगाव रामाचे या गावात गोदावरी नदीच्या किनारी बांधलेल्या घाटाच्या शिलालेखाचा अभ्यास केला. त्या शिलालेखाचे वाचन केले. अठराव्या शतकातील हा शिलालेख असून सरदार अप्पाजी गणेश वैद्य यांचा इतिहास समोर उभा राहतो. घाट आणि सिद्धेश्वर सारखे शिवमंदिर हे धार्मिक आणि सांस्कृतिक वृत्तीचे सरदार होते हे सिद्ध होते. एका कर्तबगार व्यक्तीने मंदिर आणि घाटासारखे बांधकाम करून जनसामान्यांसाठी धार्मिक व सामाजिक कार्य करून शिलालेखाच्या स्वरूपात कोरून लोकांच्या नजरेसमोर कायमचे ठेवले. हा या शिलालेखा मागील उद्देश असावा" - अनिल दुधाने, वीरगळ अभ्यासक, पुणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

SCROLL FOR NEXT