Voter Registration Campaign : निवडणूक विभागातर्फे आजपासून घरोघर जाऊन मतदार नोंदणी होणार आहे.
या मोहिमेत नवयुवकांनी नोंदणी करण्यासह राजकीय पक्षांनी त्यांचे बूथप्रमुख मतदान नोंदणी अधिकाऱ्याबरोबर पाठवून मतदार यादी निर्दोष होण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन निवडणूक उपजिल्हाधिकारी (निवडणूक) डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी केले.
निवडणूक आयोगातर्फे आजपासून मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला. ( election department will conduct door to door voter registration from today nashik news)
या संदर्भात डॉ. मंगरुळे म्हणाले, की घरोघर मतदान नोंदणी अधिकारी पाठवून नवीन मतदारांची नोंदणी तसेच जुन्याच्या इतर दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत.
१ जानेवारी २०२४ या मतदार अर्हता तारखेवर आधारित नोंदणी कार्यक्रमात मतदान नोंदणी अधिकारी घरोघर येतील. जर त्यांच्याबरोबर राजकीय पक्षांचे त्या-त्या प्रभागातील बूथ प्रतिनिधी सहभागी झाले तर मतदार याद्या अधिक निर्दोष होतील. निवडणुकीनंतर याद्यांविषयी तक्रारीचा प्रश्न येणार नाही.
यंदापासून दिव्यांग मतदार आणि ८० वर्षांहून अधिक वयाच्या मतदारांना घरच्या घरी मतदानाची सोय करण्यात येणार आहे. जिल्ह्यात साधारण एक लाख ३७ हजार २८७ ज्येष्ठ नागरिक मतदार असून, १९ हजार ४९९ दिव्यांग मतदार आहेत. या सर्वांना घरीच राहून मतदान करता येणार आहे. यंदा ब्रेल मतदान पत्रिकेचे नियोजन आहे.
४६ लाख मतदार
जिल्ह्यात ४६ लाख ३० हजार ३७५ मतदार आणि चार हजार ७२४ मतदान केंद्रे आहेत. त्यात शहरातील एक हजार ६४९ मतदान केंद्रांचा समावेश आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
प्रत्येक मतदान केंद्रासाठी बूथनिहाय अधिकारी घरी येऊन ऑनलाइन नोंदणी करतील. त्यासाठी त्यांना नेटचा ॲक्सेस असेल. जागेच्या लोकेशनसह नोंदणीमुळे अधिक अचूक नोंदणी होण्यास मदत होणार आहे.
याशिवाय, जिल्ह्यात वर्षाला साधारण दोन टक्के नवीन मतदार वाढतात. अशा मतदारांच्या नोंदणीचे प्रयत्न आहेत. मतदार स्वत: voter.eci.gov.in या संकेतस्थळावर मतदार नोंदणी करू शकतात. १९५० या टोल फ्री क्रमांकावर मदत घेऊ शकतात.
राजकीय पक्षांना हवा मतदार नोंदणीचा ॲक्सेस
तत्पूर्वी, जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक घेत त्यांच्या सूचना जाणून घेण्यात आल्या. त्यात बहुतांश राजकीय पक्षांनी घरोघर जाणारा मतदान नोंदणी अधिकारी (बीएलओ) हा त्याच वॉर्ड किंवा प्रभागातील असावा.
त्यामुळे बीएलओ नेमताना त्याचा विचार व्हावा. बीएलओप्रमाणे राजकीय पक्षांना ऑनलाइन मतदार नोंदणीचा ॲक्सेस मिळावा, यासाठी निवडणूक आयोगाकडे भावना कळवाव्यात, अशी मागणी झाली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.