election esakal
नाशिक

Nashik News : बाजार समित्यांच्या निवडणुका पुन्हा स्थगित; नेते, कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : राज्यासह नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या निवडणुकांसाठी प्रारूप मतदारयादी जाहीर होऊन हरकती प्रक्रिया सुरू झाली असताना, राज्य शासनाने बाजार समित्यांच्या निवडणुका १५ मार्च २०२३ पर्यंत स्थगित केल्या आहेत. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने जाहीर केल्याप्रमाणे बाजार समितीच्या निवडणुका घेतल्यास, सध्या जाहीर केलेल्या ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रमानुसार नवीन निवडून येणारे ग्रामपंचायत सदस्य हे बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत मतदान करण्यापासून वंचित राहतील. त्यामुळे ग्रामपंचायतीचे नवीन निवडून येणारे सदस्य बाजार समितीच्या मतदारया‍दीत समाविष्ट करून मतदारयादी अंतिम होईपर्यंत निवडणुका पुढे ढकलण्यात येत असल्याचे शासनाने काढलेल्या आदेश पत्रात म्हटले आहे. (Elections to market committees postponed again Nashik Latest Marathi News)

कोरोना संकटापासून लांबणीवर पडत असलेल्या बाजार समित्यांच्या निवडणुकांना सप्टेंबर २०२२ मध्ये मुहूर्त लागला होता. राज्य सहकार प्राधिकरणाने राज्यातील ३१ डिसेंबरअखेर निवडणुकीस पात्र असलेल्या २८१ सह नाशिक जिल्ह्यातील १४ कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यामुळे बाजार समित्यांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. यात २९ जानेवारी मतदान, तर ३० जानेवारी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार होता. या कार्यक्रमानुसार बाजार समित्यांच्या निवडणुकांसाठी प्रारूप मतदारयाद्या गत महिन्यात जाहीर झाल्या.

जाहीर झालेल्या मतदारयाद्यांवर हरकती मागविण्याची प्रक्रिया बाजार समित्यांमध्ये सुरू आहे. हरकतींवर सुनावणी होऊन डिसेंबरअखेर, अंतिम मतदारयादी जाहीर होऊन अर्ज दाखल केले जाणार होते. त्यासाठी तालुक्यातालुक्यांमध्ये राजकीय हालचालीदेखील सुरू झालेल्या होत्या. असे असताना राज्य शासनाने बाजार समित्यांच्या निवडणुकांना पुन्हा स्थगिती दिली आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून १ नोव्हेंबर २०२२ च्या पत्रान्वये राज्यातील एकूण सात हजार ७५१ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केलेला आहे.

हेही वाचा : वाचा किस्से बँकेच्या लाॅकररुममध्ये घडलेले...एका बँक अधिकाऱ्याच्याच तोंडून

सध्या जाहीर केलेल्या ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रमानुसार नवीन निवडून येणारे ग्रामपंचायत सदस्य हे बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत मतदान करण्यापासून वंचित राहू शकतील. त्यामुळे ग्रामपंचायतीचे नवीन निवडून येणारे सदस्य बाजार समितीच्या मतदारयादीत समाविष्ट करून मतदारयादी अंतिम होईपर्यंत निवडणुका घेण्यात येऊ नये, असे पत्रात नमूद केले आहे. याबाबत, औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या आदेशात बाजार समितीच्या निवडणुका १५ मार्च २०२३ पर्यंत स्थगित करण्यात असल्याचे म्हटले आहे.

येथील निवडणुका स्थगित

जिल्ह्यातील नाशिक, पिंपळगाव, लासलगाव, सिन्नर, येवला, नांदगाव, मनमाड, मालेगाव, चांदवड, देवळा, घोटी, कळवण, सुरगाणा, दिंडोरी या बाजार समित्यांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झालेली होती. त्यावर हरकतीदेखील प्राप्त झाल्या होत्या. मात्र, निवडणुका स्थगित झाल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकादेखील लांबत असताना, बाजार समित्यांच्या निवडणुका होत नसल्याने राजकीय नेते, कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

धक्कादायक! लोकप्रिय मालिकेच्या सेटवर मोठी दुर्घटना; शुटिंगदरम्यान कॅमेरा असिस्टंटचं निधन

Latest Maharashtra News Updates live : काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस प्रियंका गांधी आज महाराष्ट्र दौऱ्यावर

Nitin Gadkari: आमदार निवडताना जात का महत्त्वाची? नितीन गडकरींचा मतदारांना सवाल

Vastu Tips: घरात 'या' ठिकाणी ठेवा मोरपिस, कुटुंबात होईल भरभराट

व्यसनाधीन मुलाच्या त्रासाला कंटाळून बापाने डोक्यात टिकाव घालून मुलाचा केला खून, आदित्यने मुलगी पळवून आणली अन्..

SCROLL FOR NEXT