नाशिक : केंद्र सरकारकडून नाशिक महापालिकेच्या सिटीलिंक बससेवेसाठी ५० इलेक्ट्रिकल बस मिळणार असल्याने त्यासाठी आडगाव ट्रक टर्मिनसलगतच्या उर्वरित आरक्षित जागेवर इलेक्ट्रिक बस डेपो उभारण्याच्या २७.४७ कोटी रुपये खर्चाच्या प्रस्तावाला महासभेने मंजुरी दिली आहे.
त्यापाठोपाठ आता निधी परत जाऊ नये म्हणून तातडीची बाब म्हणून स्थायी समितीवर मंजुरीसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम अर्थात नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम (एन-कॅप) अंतर्गत निधी उपलब्ध होणार आहे. (Electric Bus Depot at Adgaon Truck Terminus Funds under NCap on Standing Committee after approval by General Assembly Nashik News)
महापालिकेच्या सिटीलिंक बससेवेच्या माध्यमातून शहरात २०० सीएनजी, तर ५० डिझेल अशा एकूण २५० बस चालविल्या जातात. बससेवा पर्यावरणपूरक होण्याच्या दृष्टीने ५० इलेक्ट्रिक बस घेण्यासाठी केंद्राच्या फेम-२ योजनेंतर्गत शासनाला प्रस्ताव सादर करण्यात आला होता.
परंतु केंद्र सरकारकडे प्रस्ताव मंजूर झाला नाही. केंद्र सरकारनेच एन-कॅप योजनेंतर्गत इलेक्ट्रिक बस खरेदीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविला. या योजनेंतर्गत प्रतिवर्षी २५ बस खरेदीकरिता प्रतिबस ५५ लाख रुपयांपर्यंतचे अनुदान प्राप्त होणार आहे.
महापालिका दोन टप्प्यांत ५० इलेक्ट्रिक बस खरेदी करणार आहे. या बसकरिता आडगाव ट्रक टर्मिनस येथील उर्वरित आरक्षित जागेत स्वतंत्र बस डेपोची उभारणी केली जाणार आहे.
याअंतर्गत मेन्टेनन्स शेड, पार्किंग, वॉशिंग रॅम्प, इमारतीचे विद्युतीकरण, फायर सुरक्षा आदींसाठी २७.४७ कोटींचा खर्च लागणार आहे. एन-कॅप अंतर्गत निधी प्राप्त होणार आहे. त्यामुळे महासभेची मंजुरी मिळाल्यानंतर आता स्थायी समितीवर प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.