MSEB esakal
नाशिक

Nashik MSEB News : सुटीची दिवशीही वीजबिल भरणा केंद्र सुरू

ग्राहकांना बिलाचा भरणा करणे अधिक सुलभ व्हावे, यासाठी ३० व ३१ डिसेंबर या साप्ताहिक सुटीच्या दिवशीही वीजबिल भरणा केंद्र सुरू ठेवण्याचे निर्देश नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी दिले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Nashik MSEB News : ग्राहकांना बिलाचा भरणा करणे अधिक सुलभ व्हावे, यासाठी ३० व ३१ डिसेंबर या साप्ताहिक सुटीच्या दिवशीही वीजबिल भरणा केंद्र सुरू ठेवण्याचे निर्देश नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी दिले आहेत.

त्यानुसार नाशिक परिमंडलांतर्गत नाशिक जिल्ह्यातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र शनिवार आणि रविवार या सुटीच्या दिवशी सुरु राहतील.(Electricity bill payment center open even on holidays nashik mseb news)

उपलब्ध सुविधेसह डिजिटल माध्यमातून ग्राहकांनी आपल्या चालू व थकीत वीजबिलाचा भरणा करून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे. ग्राहकांच्या सोयीसाठी वीजबिल भरणा केंद्र सुरू ठेवण्यासोबतच थकीत वीजबिल वसुलीसाठी कारवाई सुटीच्या दिवशी सुरू राहणार आहे. थकबाकीदार ग्राहकांनी वीजपुरवठा खंडित होण्याची कटू कारवाई टाळण्यासाठी आपल्या बिलाचा भरणा वेळेत करावा.

अधिकृत वीजबिल भरणा केंद्राशिवाय महावितरणच्या मोबाईल ॲपवर बिल भरणा तसेच इतर सर्व सुविधा हाताच्या बोटावर उपलब्ध आहेत. www.mahadiscom.in या संकेतस्थळावर केवळ बारा अंकी ग्राहक क्रमांक नमूद करून नेट बँकिंग, डेबिट किंवा क्रेडिट कार्ड आदींच्या माध्यमातून बिल भरता येते.

याशिवाय बाजारात उपलब्ध असलेल्या विविध पेमेंट वॉलेटचा उपयोग करून घरबसल्या बिलाचा ऑनलाइन भरणा करण्याची सुविधा आहे. तसेच बिलावर दिलेला क्यूआर कोड स्कॅन करूनही थेट पेमेंट गेटवेवर जाऊन वीजबिल भरणे सुलभ होते, या डिजिटल माध्यमांचा वापर करून घरबसल्या वीजबिल भरता येईल. अखंडित वीज सेवेसाठी उपलब्ध सुविधांचा उपयोग करून चालू व थकीत वीजबिलाचा भरणा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT