एकलहरे (जि. नाशिक) : महानिर्मिती, महापारेषण व महावितरण या तिनही अधिकारी आणि कर्मचारी आज मध्यरात्रीपासून संपावर जाणार आहेत. विज क्षेत्रातील खासगीकरणाला विरोध करण्यासाठी तिन्हीं कंपन्यांची कर्मचार्यांनी संपाची हाक दिली आहे.
अदानी समूहाला वीज वितरणचा परवाना देण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप करत तिनही कंपन्यांच्या कर्मचार्यांच्या ३१ संघटनांनी हा संप पुकारला आहे. तीन दिवसीय राज्यव्यापी संपामुळे महाराष्ट्रातील भागांत तांत्रिक बिघाड झाल्यास, मोठ्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.
विज निर्मितीची - महावितरणची धुरा ही कंत्राटी कामगार (आऊट सोर्सिंग) व वरिष्ठ अधिकाऱ्याच्या भरवश्यावर राहणार आहे. (Electricity Companies Strike All three companies in electricity sector are on strike from midnight nashik news)
७२ तासांचा संप
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ अर्थात तिन्ही कंपन्यांचे सर्व अधिकारी , अभियंते आणि कर्मचारी असे ८६ हजार कामगार अभियंते या ४ तारखेच्या शून्य प्रहरापासून सुरू होणाऱ्या संपात सहभागी होत आहेत.
विज कंपन्यांच्या कर्मचार्यांकडून तीन दिवसीय राज्यव्यापी संप पुकारण्यात आला आहे. विज क्षेत्राचे खासगीकरण करण्याच्या विरोधात ही संपाची हाक देण्यात आली आहे. गरज पडल्यास हा राज्यव्यापी संप तीन दिवसांनंतरही सुरु ठेऊ अशी भूमिका कर्मचार्यांनी घेतली आहे.
महानिर्मिती कंपनीत विज निर्मिती सुरळीत रहावी यासाठी मध्य प्रदेश, हरियाणा व झारखंड अशा बाहेरील राज्यातील वीज तंत्रज्ञ व अभियंता यांना पाचारण करण्यात येणार होते पण तेथील संघटनांनी या गोष्टीचा निषेध करून नकार कळविला आहे.
संपाचा परिणाम
*ग्रीड स्टेबल न राहिल्यास मुंबई तसेच इतर महानगरे अंधारात जाण्याची दाट शक्यता आहे.
*वितरण सेवेत गोंधळ झाल्यास रुग्णालयांचा (ज्या ठिकाणी जनित्र नाहीत) रुग्णांना फटका बसू शकतो.
*इंटरनेट व जीवनावश्क सेवा बनलेला मोबाईल वरील सोशल साईट व माध्यमांवर परिणाम होईल.
*कांदे लागवड व द्राक्ष बाग पाणी भरणेसाठी शेती व्यवसायास फटका बसू शकतो.
*वीजपुरवठा खंडित झाल्यास औद्यगिक वसाहतींना मोठ्या प्रमाणात फटका.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.