National Health Mission esakal
नाशिक

SAKAL Impact : पीबी बीएसस्सी नर्सिंगचे उमेदवारांना ठरविले पात्र; उमेदवारांना मिळणार संधी

नरेश हाळणोर

नाशिक : राष्ट्रीय आरोग्य मिशनअंतर्गत (एनएचएम) आरोग्य विभागात समुदाय आरोग्य अधिकारी पदासाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. मात्र, आरोग्य विद्यापीठाचीच अभ्यासक्रम असलेल्या पोस्ट बेसिक नर्सिंग कोर्स केलेल्या उमेदवारांना या भरतीपासून डावलत अपात्र ठरविण्यात आले होते.

याबाबतचे वृत्त ‘सकाळ’ मधून प्रसिद्ध होताच, या बाबत बुधवारी (ता.४) एनएचएमच्या सहसंचालकांनी आदेश जारी करीत पोस्ट बेसिक नर्सिंग कोर्स केलेल्या उमेदवारांना भरतीसाठी पात्र ठरविले असून २२ तारखेला होणारी प्रवेश परीक्षा देता येणार आहे. त्यामुळे या उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. (Eligible for PB BSc Nursing candidates Candidates will get opportunities SAKAL Impact nashik news)

याबाबतचे वृत्त ‘सकाळ’ मधून प्रसिद्ध

राष्ट्रीय आरोग्य मिशनअंतर्गत राज्यातील आरोग्य विभागाच्या आरोग्यवर्धिनी केंद्र, उपकेंद्रामध्ये समुदाय आरोग्य अधिकारी पदासाठीची भरती प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी बीएएमएस, बीएसस्सी नर्सिंग आणि पोस्ट बेसिक बीएसस्सी नर्सिंग हा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या उमेदवारांनी अर्ज सादर केले होते.

मात्र, यापूर्वी झालेल्या भरतीमध्ये पोस्ट बेसिक बीएसस्सी नर्सिंग कोर्स केलेल्यांना पात्र ठरविण्यात आलेले असताना, यावेळी मात्र अपात्र ठरवून प्रवेश परीक्षेसाठी डावलण्यात आले होते. त्यामुळे पीबी बीएसस्सी नर्सिंग कोर्स केलेल्या उमेदवारांमध्ये असंतोष निर्माण होऊन त्यांनी नाशिक विभागाचे आरोग्य उपसंचालकांकडे विचारणा केली.

मात्र त्यांना समाधानकारक उत्तर मिळू शकले नाही. बीएस्सी नर्सिंग समकक्ष पीबी बीएसस्सी नर्सिंग कोर्स असून, आरोग्य विद्यापीठांतर्गत कोर्स घेतला जात असताना या उमेदवारांना डावलल्याने मोठा प्रश्न उभा राहिला होता.

याची दखल ‘सकाळ’ ने घेत सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाले. त्या वृत्ताची दखल राष्ट्रीय आरोग्य मिशनचे सहसंचालक डॉ. विजय कंदेवाड यांनी घेतली. तत्काळ याबाबत नव्याने आदेश जारी करीत, पोस्ट बेसिक बीएसस्सी नर्सिंग कोर्स केलेल्या उमेदवारांना पात्र ठरविणारा आदेशाचा जीआर काढला. त्यामुळे डावलण्यात आलेल्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला असून, त्यांना येत्या २२ तारखेची प्रवेश परीक्षा देता येणार आहे.

हेही वाचा : ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट

दोन्ही कोर्स समकक्षच

समुदाय आरोग्य अधिकारी पदासाठी पोस्ट बेसिक बीएसस्सी नर्सिंग कोर्स केलेल्या उमेदवारांना अपात्र ठरविण्यात आले. त्याचे पडसाद उमटल्याने एनएचएमकडून याबाबत महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाकडे अभिप्राय मागविण्यात आला.

त्यात बीएस्सी नर्सिंग व पोस्ट बेसिग बीएसस्सी नर्सिंग अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना एम.एस्सी नर्सिंग कोर्स करण्यास पात्र आहेत. त्यामुळे बीएस्सी नर्सिंग व पोस्ट बेसिक बीएसस्सी नर्सिंग हे दोन्ही अभ्यासक्रम समकक्ष असल्याने अपात्र ठरविण्यात आलेल्या उमेदवारांना पात्र ठरले आहेत.

"महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि नर्सिंग कौन्सिलकडे या दोन्ही अभ्यासक्रमांबाबत अभिप्राय मागविण्यात आला असता, त्यांनी ते समकक्ष असल्याचा अभिप्राय दिला. त्यामुळे आयुक्तांच्या आदेशान्वये पोस्ट बेसिक बीसएस्सी नर्सिगचे उमेदवारही यासाठी पात्र आहेत. सकारात्मक दृष्टिकोनातून निर्णय घेण्यात आल्याने कोणाचेही नुकसान होणार नाही."

- डॉ. विजय कंदेवाड, सहसंचालक, राष्ट्रीय आरोग्य मिशन.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT