crime news esakal
नाशिक

Nashik Crime News : सिद्धिविनायक पतसंस्थेतील अपहार; चौघा संशयितांची मध्यवर्ती कारागृहात रवानगी

उत्तम गोसावी : सकाळ वृत्तसेवा

ओझर (जि. नाशिक) : आर्थिक गुन्हे शाखेकडून पतसंस्था संचालकांसह लेखापरिक्षकांनाही नोटीस जारी केली आहे. त्यामुळे संस्थेच्या अपहरण प्रकरणात कोण कोण सापडतात याकडे लक्ष लागून आहे. तर सहकार क्षेत्रात आर्थिक अपहरणाची उलटसुलट चर्चा रंगू लागली आहे. अपहरणाचे धागेदोरे कुणाकुणाच्या अंगाभोवती आकडतात हे हळूहळू उलगडत जाणार आहे. (embezzlement in Siddhivinayak credit institution Four suspects sent to Central Jail Nashik Latest Crime News)

ओझर येथील सिद्धिविनायक नागरी सहकारी पतसंस्थेत सुमारे तीन कोटी ते ३३ लाख २५ हजार रुपयांच्या अपहार प्रकरणी चौघा संशयितांची पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना आर्थिक गुन्हे शाखेने पिंपळगाव बसवंत न्यायालयात हजर केले होते. यावेळी न्यायालयाने चौघा संशयितांची मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्याचा आदेश दिल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक मेश्राम यांनी दिली.

ओझर येथील सिद्धिविनायक नागरी सहकारी पतसंस्थेत तीन कोटी ३३ लाख रुपयांचा अपहार झाल्याची तक्रार तुषार बाजीराव पगार यांनी ओझर पोलिस ठाण्यात दाखल केली होती. त्यानुसार ओझर पोलिसांनी कारवाई करत मुख्य सूत्रधार सिद्धीविनायक पतसंस्थेचा लेखापाल दिनेश सौचे, वृंदा दिनेश सौचे, सचिन बाळासाहेब इंगळे, प्रवीण जीभाऊ आहेर, महेश व्यवहारांतील रामदास शेळके, प्रमोद अमृत जाधव या संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला होता.

Elon Musk Takeover Twitter : ट्विटरची टिवटिव थांबणार का?

संशयितांपैकी बँकेचे लेखापाल दिनेश सौचे, सचिन इंगळे, प्रवीण अहिरे, महेश शेळके यांना पिंपळगाव न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना २१ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. पुढील तपास ओझर पोलिस ठाण्याकडून आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने सोमवारी (दि. २१) संशयितांची पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने संशयितांची मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली आहे.

पुढील तपास जलद गतीने करत सिद्धिविनायक पतसंस्थेतील असलेल्या आर्थिक सर्व माहिती मागवण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक मेश्राम यांनी दिली असून पतसंस्थेतील संचालकांसह ऑडिटर यांना नोटीस जारी करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. यामध्ये दोषी आढळणाऱ्या सर्व संशयितांना ताब्यात घेण्यात येणार असून यासंदर्भातील पुढील कारवाई पोलिस अधीक्षक सयाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut: उद्धव ठाकरे नाही; शरद पवारांचा 'खास'माणूस मुख्यमंत्री होणार? राऊतांनी थेट नावच सांगितलं!

म्हणून तुझ्यासोबत कुणी काम करत नाही... अनिल कपूर यांचं नाना पाटेकरांबद्दल थेट वक्तव्य ; म्हणाले- सगळ्यांना मारून

Cha.Sambhajinagar: इम्तियाज जलीलांवर ॲट्रोसिटी गुन्हा दाखल; मतदानाच्या दिवशी झाला होता वाद

Imtiaz Jaleel : बूथ कॅप्चर भाजपने केले अन् गुन्हा माझ्यावर कसा? इम्तियाज जलील

AUS vs IND 1st Test: भारतीय फलंदाजी ऑस्ट्रेलियन वेगवान माऱ्यासमोर कोलमडली! कसाबसा गाठला १५० धावांचा टप्पा

SCROLL FOR NEXT