Vice Chancellor Lieutenant General (retired) Dr. Dignitaries including Madhuri Kanitkar. esakal
नाशिक

MUHS Budget : स्‍कील लॅब, संशोधन अन्‌ विद्यार्थी योजनांवर भर

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : महाराष्ट्र आरोग्‍य विज्ञान विद्यापीठाच्‍या मंगळवारी (ता. १४) झालेल्‍या अधिसभा बैठकीत २०२३-२४ चे अंदाजपत्रक मांडण्यात आले. यामध्ये स्‍कील लॅब, संशोधनाला प्रोत्‍साहन देण्यासह विद्यार्थ्यांच्‍या कल्‍याणकारी योजनांसाठी भरीव तरतूद करण्यात आलेली आहे.

परिरक्षण, विकास आणि स्वतंत्र प्रकल्प व योजना अशा तीन प्रकारात अर्थसंकल्प विभागला आहे. (Emphasis on skill lab research and student schemes MUHS Budget nashik news)

कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल (निवृत्त) डॉ. माधुरी कानिटकर यांच्‍या अध्यक्षतेखाली अधिसभा बैठक झाली. प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांच्‍यासह अधिसभा सदस्य उपस्थित होते.

डॉ. अजय चंदनवाले यांनी अर्थसंकल्प, तर डॉ. आशुतोष गुप्ता यांनी लेखा अहवाल सादर केला. महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण संशोधन संस्थेचे २०२३-२४ चे अंदाजपत्रक डॉ. सचिन मुंबरे यांनी सादर केले. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी सभेचे संचलन केले.

अध्यक्षीय मनोगतात कुलगुरु डॉ. कानिटकर म्‍हणाल्‍या, की गुणात्मक दर्जावाढीसाठी विद्यापीठाच्या अर्थसंकल्पात विविध उद्दिष्ट्ये, नवीन योजना कार्यान्वीत केल्‍या जातील. महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण संशोधन संस्थेसाठी तरतूद केली आहे.

विद्यार्थी ज्ञान संवर्धनासाठी विद्यापीठाकडून विविध उपक्रम राबविले जातील. विद्यार्थ्यासाठी कल्याणकारी योजना, स्किल लॅब व विद्यार्थी केंद्रबिंदु असून यासंदर्भात तरतूद केलेल्‍या आहेत.

अर्थसंकल्पासाठी गठीत समितीमध्ये अध्यक्ष डॉ. चंदनवाले, सदस्य डॉ. मुंबरे, डॉ. जयंतराव पळसकर, डॉ. श्रीकांत देशमुख, डॉ. धनाजी बागल, डॉ. राजश्री नाईक, डॉ. विठ्ठल धडके, डॉ. बाळासाहेब पवार, डॉ. कविता पोळ, डॉ. अजित गोपछडे, डॉ. दत्तात्रय पाटील, मोहंमद हुसैन यांच्यासह कुलसचिव, परीक्षा नियंत्रक, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक व वित्त व लेखाधिकारी यांचा समावेश होता.

महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण संशोधन संस्थेचे अधिष्ठाता डॉ. सुशिलकुमार झा, परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, वित्त व लेखाधिकारी एन. व्ही. कळसकर या वेळी उपस्थित होते.

२२ कोटी ७९ लाखांची तूट अपेक्षित

विद्यापीठाच्या २०२३-२४ च्‍या अर्थसंकल्पानुसार विद्यापीठाचे एकत्रित उत्पन्न ५१९ कोटी ९१ लाख रुपये अपेक्षित आहे. उत्पन्नाच्या तुलनेत एकत्रित खर्च ५४२ कोटी ७० लाख रुपये अपेक्षित असल्याने वित्तीय तूट २२ कोटी ७९ लाख रुपये अपेक्षित आहे.

हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

विविध विषयांवर जनजागृती

शिक्षक, विद्यार्थी मानसिक ताण-तणावापासून मुक्त राहाण्यासाठी समुपदेशन, व्यक्तीमत्व विकास आदींचे माध्यम अवलंबले जाईल. प्रभावी शिक्षण, अवयवदान, कुपोषण, स्वच्छमुख अभियानाबाबत सामाजिक जनजागृतीसाठी तरतूद केलेली आहे.

अर्थसंकल्‍पातील ठळक तरतूदी

* विद्यापीठाचे रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त राबविणार विविध उपक्रम

* संशोधनाला प्रोत्साहनासाठी ३ कोटी १५ लाखांची तरतूद

* संशोधन प्रकल्प, संशोधन प्रयोगशाळा, संशोधन कार्यशाळा, विद्यापीठातर्फे संशोधन विषयक नियतकालिक, संशोधनास प्रोत्साहन देण्यासाठी प्रवास अनुदानाचा समावेश

* विद्यार्थी कल्याणकारी योजनांची आखणी, योजनांसाठी ५ कोटी २५ लाखांची तरतूद

* विद्यार्थ्यांसाठी धन्वंतरी विद्याधन योजना, बहीःशाल शिक्षण, मुलींसाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, कमवा व शिका योजना, विद्यार्थी अपघात विमा आदी योजनांचा समावेश

* विद्यापीठाच्या उपक्रमांची माहिती देणारे ॲप विकसीत करणार, पाच लाखांची तरतूद

* सामाजिक जाणीव जागृती उपक्रमांसाठी १० लाख, माजी विद्यार्थी संघटनेसाठी २० लाखांची तरतूद

* शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी विद्यापीठाच्या कामानिमित्त अन्य शहरात प्रवास करताना अपघाती, नैसर्गिक मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास विद्यापीठाकडून मदत

* विद्यापीठाचे मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, लातूर येथील विभागीय केंद्रे सक्षम करण्यासाठी भरीव तरतूद

* नाशिकला विकास कामांसह नागपूर, औरंगाबाद, पुणे, कोल्हापूर विभागीय केंद्रांतील विकास कामे, बांधकामांचा समावेश

* विद्यापीठ व विभागीय केंद्राच्या ठिकाणी अद्ययावत संशोधन प्रयोगशाळांची होणार निर्मिती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Nagpur AIIMS Recruitment: नागपूर एम्समध्ये विविध विभागांसाठी ‘ग्रुप-ए’ पदांची थेट भरती, पगार २ लाख रुपये; असा करा अर्ज

Gold Investment : महिला आणि संपत्ती: तरुणींमध्ये सोन्यात गुंतवणूक करण्याचा वाढता कल

Latest Marathi News Updates live : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षक अन् दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु

SCROLL FOR NEXT