civil hospital latest marathi news esakal
नाशिक

Employees Strike : सिव्हिलच्या संपकरी कर्मचाऱ्यांना नोटिसा बजावणार

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जुनी पेन्शन योजना सुरू करण्यासाठी कर्मचाऱ्‍यांच्या बेमुदत संपामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण आला असून, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात कर्मचाऱ्‍यांना कामावर हजर होण्याबाबत नोटीस देणार आहेत.

कामावर हजर न झाल्यास आंदोलनात सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई केली जाण्याची शक्यता आहेत. (Employees Strike Distric Surgeon will issue notices to civil hospital employees nashik news)

जिल्हा रुग्णालयातील संपावर असलेल्या कर्मचाऱ्‍यांच्या कमतरतेमुळे प्रसूतीसह इतर गंभीर आजारांच्या रुग्णांवर आडगाव येथील डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेज व घोटी येथील एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये उपचार केले जाणार आहेत.

त्यासाठी जिल्हा रुग्णालयाकडून दोन्ही रुग्णालयांना पत्रव्यवहार केला जाणार आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी दिली. बेमुदत संपावर कर्मचारी असल्याने कंत्राटी कर्मचाऱ्‍यावर ताण आला आहे.

जिल्हा रुग्णालयातील ८९१ कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. संपाच्या तिसऱ्‍या दिवशी बुधवारी (ता.१५) जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय कामकाज कंत्राटी कर्मचाऱ्‍यांना करावे लागले. जिल्हा रुग्णालयात ९२३ कंत्राटी कर्मचाऱ्‍यांना ८ तासांऐवजी १२ तास कामकाज करावे लागत आहे.

हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?

यामध्ये २६२ डॉक्टर, ६६१ कर्मचारी व ३८९ कंत्राटी परिचारिका आहेत. दोन दिवसांत १३४ जणांवर गंभीर आजाराच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. तीन दिवसांत १२ हून अधिक नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत. ओपीडीमध्ये कर्मचारी नसल्याने शेकडो रुग्णांचे हाल झाले.

शासकीय कर्मचाऱ्‍यांनी गुरुवारी सकाळी गोल्फ क्लब, शालिमार ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत महारॅलीत जिल्हा रुग्णालयातील संपावरील कर्मचारी सहभागी झाले होते. संपामध्ये जिल्हा नर्सेस असोसिएशनही सहभागी झाली होती.

कंत्राटी कर्मचाऱ्‍यांच्या भरवशावर जिल्हा रुग्णालयात रुग्णसेवा सुरू होती. कायम कर्मचारी संपात सहभागी झाल्याने रुग्णसेवेची भिस्त एनआरएचएम अंतर्गत नेमलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्‍यांवर सोपविण्यात आली आहे. शिवाय नर्सिंगच्या विद्यार्थ्यांचीही रुग्णसेवेसाठी मदत घेण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: निकालाचे कौल मानण्यास संजय राऊतांचा नकार

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीत उतरले अन् तिरंगी लढतीच्या चक्रव्यूहात अडकले; ठाकरे ब्रँडचं काय होणार?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

Whatsapp Call Recording : मिनिटांत रेकॉर्ड करा व्हॉट्सॲप कॉल, सोपी स्टेप वाचा एका क्लिकमध्ये..

Margashirsha Amavasya 2024: मार्गशीर्ष अमावस्येच्या शुभ मुहूर्तावर करा गंगा स्नान, जाणून घ्या महत्व

SCROLL FOR NEXT