Employment to the unemployed due to nashik municipal elections  esakal
नाशिक

नाशिक : निवडणुकीमुळे बेरोजगारांना सुगीचे दिवस

युनूस शेख

जुने नाशिक : महापालिका निवडणुकांची तारीख निश्चित नसली तरी, इच्छुकांकडून निवडणुकीची लगीनघाई केली जात आहे. त्यांच्याकडून मतदारांपर्यंत पोचण्यासाठी विविध प्रकारची कामे सुरू आहे. त्यातून बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. काही महिने तरी बेरोजगारांना सुगीचे दिवस आले आहे. (nashik municipal elections)

इच्छुक उमेदवारांच्या तयारीत गरजुंना रोजगार

महापालिका निवडणुकांना घेऊन शहरातील वातावरण तापलेले आहे. आचारसंहिता कधी लागणार, निवडणुकांची काय तारीख असेल याबाबत निश्चित माहिती नाही. केवळ सर्वांकडून अंदाज बांधले जात असताना अशात मात्र इच्छुक उमेदवारांकडून निवडणुका लागतील तेव्हा लागतील याची चिंता न करता मतदारांपर्यंत कसे पोचता येईल. यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहे. दिनदर्शिकांचे वाटप करणे, प्रभागाची माहिती देणारे पत्रक, निवडणुकीत आपण इच्छुक आहोत यासंदर्भातील पत्रकांसह विविध शिबिर, कार्यक्रमांचे आयोजन करणे त्या कार्यक्रमाची प्रभागातील रहिवाशांना माहिती व्हावी आणि त्यांनी जास्तीत जास्त कार्यक्रमांना उपस्थित रहावे. शिबिराचा लाभ घ्यावा असा प्रयत्न देखील आयोजक तसेच इच्छुक उमेदवारांकडून केला जात आहे. यातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे प्रत्यक्ष मतदारांची भेट घेऊन इच्छुक उमेदवारांची माहिती, छायाचित्र, आगामी काळातील त्यांच्याकडून केले जाणाऱ्या कामांची माहिती यासंदर्भातील पत्रक पोचवून त्यांच्याशी घनिष्ठता निर्माण केली जात आहे.

तीनशे रुपये रोज सुरु

इच्छुक उमेदवारास प्रत्येक मतदात्यापर्यंत पोचणे, प्रत्येक काम स्वतः करणे शक्य नाही यासाठी त्यांच्याकडून अन्य व्यक्तींची मदत घेतली जात आहे. त्यांना रोजंदारीवर नियुक्त करून त्यांच्याकडून विविध प्रकारची कामे करून घेतली जात आहे. यातून अनेकांना विशेषता महिला व तरुणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. शंभर ते तीनशे रुपये रोज त्यांना दिला जाता आहे. त्यामुळे त्यांच्याकडून स्वखुशीने कामे केली जात आहेत. शहराच्या विविध भागात अशाच प्रकारचे वातावरण दिसून येत आहे.

.

कोरोनातील बेकारीच्या जखमेवर निवडणुकीतील रोजगारीचा मलम

कोरोनामुळे रोजगार हिरावलेल्यांना तसेच कर्जबाजारी झालेल्यांना निवडणुकीच्या कामांची एक सुवर्णसंधी दिसत आहे. काही महिने तरी या रोजगारातून परिस्थिती सुधारण्यास मदत होईल. शिवाय नवीन काही करण्याची संधी उपलब्ध होईल, कामे मागून देखील कामे मिळत नव्हती. हाताचे काम सुटले होते. त्यामुळे उपासमारीची वेळ आली होती. त्याउलट निवडणुकांमुळे घरबसल्या कामे चालून येत आहे. उपासमारीचे जे संकट घोंगावत होते ते काहीसे दूर झाल्याच्या प्रतिक्रिया देखील कामगारांकडून देण्यात आल्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतांच्या मोजणीमध्ये अजित पवारांनी घेतली आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: विक्रोळीत सुनील राऊत आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT