Encroachment on the Eidgah is surrounded by barricading esakal
नाशिक

Nashik News : ईदगाह मैदानावर अतिक्रमणास पोलिसांकडून बॅरेकेटिंगचा वेढा!

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : गोल्फ क्लब ईदगाह मैदानावर सध्या महापालिकेच्या दुर्लक्षामुळे प्रचंड अतिक्रमण वाढले आहे. ईदच्या दिवशी जणू महापालिकेचे अपयश उघडे पडू नये, तसेच नमाज दरम्यान कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी मैदानावरील संपूर्ण अतिक्रमणास पोलिसांनी बॅरिकेटिंगचा वेढा मारत विशेष दक्षता घेतली.

मात्र, त्यामुळे हा प्रश्‍न सुटणार नाही, तर या ठिकाणी महापालिकेने तातडीने विशेष मोहीम राबविण्याची गरज आहे, अशी मागणी मुस्लिम बांधवांकडून होत आहे. (Encroachment on the Eidgah Maidan surrounded by police barricading Nashik News)

अनादी काळापासून गोल्फ क्लब ईदगाह मैदानावर शहर-ए-खतिब यांच्या नेतृत्त्वाखाली रमजान ईद आणि बकरी ईदची सामुदायिक नमाज पठण होत असते. हजारो मुस्लिम बांधव त्यासाठी या ठिकाणी येत असतात.

मात्र, धार्मिक, सामाजिक आणि ऐतिहासिक महत्व असलेले ईदगाह मैदान सध्या अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहे. गेल्या काही वर्षांपासून काही जण येथे अतिक्रमण करून राहात आहे. दिवसेंदिवस येथील झोपड्यांचे अतिक्रमण वाढत आहे.

अतिक्रमणात वाढ होत राहिल्यास भविष्यात नमाजसाठी जागा शिल्लक राहणार नाही, अशी परिस्थिती आहे. महापालिकेने येथील अतिक्रमणावर लगाम घालावी, अशी मागणी मुस्लिम बांधवांसह सामाजिक संस्थांकडून करण्यात आली आहे.

तरीदेखील महापालिकेकडून याकडे दुर्लक्ष केले आहे. परंपरेनुसार शनिवारी (ता. २२) येथे रमजान ईदचे सामुदायिक नमाज पठण झाले. त्यावेळी महापालिकेने जरी दुर्लक्ष केले असले, तरी पोलिसांनी मात्र अतिक्रमाणाकडे दुर्लक्ष केले नाही.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

नमाजदरम्यान कुठल्याही प्रकारे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी याची काळजी घेत पोलिसांनी ईदगाह मैदानावरील संपूर्ण अतिक्रमणास बॅरेकेटिंगचा वेढा मारला. शिवाय पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

नमाज पठण होईपर्यंत पोलीस त्याठिकाणी तळ ठोकून होते. ज्या पद्धतीने पोलिसांनी भविष्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न उद्‌भवण्याची शक्यता लक्षात घेत बॅरेकेटिंगचा करण्यात आले, त्याचप्रमाणे महापालिकेनेही आपली जबाबदारी ओळखत भविष्यात येथील अतिक्रमणात वाढ होणार नाही याची काळजी घ्यावी.

येथील अतिक्रमण काढण्यासाठी मोहीम राबवावी. अशी मागणी मुस्लिम बांधवांकडून होत आहे. भविष्यात कुठल्याही प्रकारची दुर्घटना घडल्यास त्यास महापालिका प्रशासन जबाबदार राहील, असे या वेळी सांगण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT