पंचवटी : मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, स्मार्ट सिटीचे सीईओ सुमंत मोरे यांनी रामतीर्थसह गोदाघाटावर शुक्रवारी (ता.२५) सकाळच्या सुमारास अचानक पाहणी केली. यानंतर मनपाकडून रामतीर्थ परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. अतिक्रमण निर्मूलन विभागाने अनेक व्यावसायिकांचे साहित्य जप्त केले.
चतुःसंप्रदाय आखाडा जवळील वाहन पार्किंग परिसरात तसेच, रामतीर्थ, अहिल्याराम पटांगण, जुना भाजीबाजार पटांगण, गांधी तलाव, देवममलेदार यशवंतराव महाराज पटांगणसह आदी भागात गेल्या काही दिवसांपासून छोटे-मोठे व्यावसायिक अनधिकृतपणे दुकाने थाटत आहेत. यातच मनपा आयुक्तांनी शुक्रवारी अचानकपणे पाहणी दौरा केला. (Encroachment removal campaign Seized materials from businessmen in Ramtirtha area Municipal Commissioner Smart City CEO surprise visit Nashik News)
यावेळी परिसरात अनेक छोट्या मोठ्या व्यावसायिकांनी अनधिकृतपणे हातगाडी, टपरी व दुकाने थाटली असल्याचे निदर्शनास आले. मनपा आयुक्तांनी मनपा अधिकाऱ्यांना धारेवर धरत, पंचवटी विभागीय अधिकारी कैलास राभडीया यांना तत्काळ अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिले.
यानंतर लागलीच पंचवटी विभागीय कार्यालयाच्या अतिक्रमण विभागाने चतुःसंप्रदाय आखाडा वाहन पार्किंग परिसरात मोहीम सुरू केली. यावेळी अतिक्रमण कर्मचाऱ्यांनी अनेक व्यावसायिकांचे साहित्य जप्त केले. तर टपरी धारकांना आपापल्या टपऱ्या हटविण्यासाठी अवधी दिला. यामुळे येथील व्यावसायिकांची चांगलीच धावपळ उडाली.
या मोहिमेला व्यावसायिकांनी विरोध केला नसला तरी, ही मोहीम यापुढेही रामतीर्थ, गोदाघाट परिसरात सुरू राहणार असल्याचे पंचवटी विभागीय अधिकारी कैलास राभडीया यांनी सांगितले. मोहीम सुरू असताना कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पंचवटी पोलिस तैनात करण्यात आले होते.
हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....
म्हणून कारवाईचा बडगा
स्मार्ट सिटी अंतर्गत रामतीर्थ परिसरात विविध विकासकामे सुरू आहेत. चतुःसंप्रदाय आखाडा जवळील वाहन पार्किंग जागेवर दगडी फारशा आदी ठिकाणी नव्याने पूल तयार करण्याचे काम सुरू आहे. याचा त्रास अनेकदा येथील व्यावसायिकांना होत असल्याने, चार पाच दिवसांपूर्वी येथील व्यावसायिकांनी बांधकाम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केल्याचे बोलले जात आहे.
व्यावसायिकांची उडाली धावपळ
अतिक्रमण मोहीम सुरू होताच काही छोट्या मोठ्या व्यावसायिकांची चांगलीच तारांबळ उडाली. या मोहिमेला व्यावसायिकांचा विरोध झाला नसला तरी टपऱ्या सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी व्यावसायिक धावपळ करीत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.