Dr. Ashok Karanjkar esakal
नाशिक

Nashik News: अपघातप्रवण 26 चौकांमधील अतिक्रमण हटणार; आयुक्त रुजू झाल्यानंतर अतिक्रमण विभागाला जाग

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : शहरातील २६ अपघातप्रवण चौकांमधील अतिक्रमण हटविण्यासाठी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाला जाग आली आहे.

नवीन आयुक्त डॉ. अशोक करंजकर मंगळवारी विभागांचा आढावा घेणार असल्याने त्यापार्श्वभूमीवर अतिक्रमण विभागाने विभागीय अधिकाऱ्यांना पत्र पाठविल्याचे बोलले जात आहे. (Encroachments will be removed in 26 accident prone squares encroachment department was created after commissioner joined Nashik News)

मागील वर्षे ऑक्टोबर महिन्यात छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील हॉटेल मिरचीजवळ बसचा अपघात झाला. यात बारा प्रवाशांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळाची पाहणी केली.

त्या वेळी अपघातप्रवण क्षेत्रांचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या. त्या अनुषंगाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, शहर पोलिस वाहतूक शाखा, प्रादेशिक परिवहन विभाग व महापालिकेच्या वतीने संयुक्त सर्वेक्षण करण्यात आले.

यात शहरात २६ अपघातप्रवण क्षेत्र अपघातात ब्लॅक स्पॉट आढळले. वाहतूक सुरक्षा समितीला अहवाल प्राप्त झाल्यानंतर शहरातील प्रमुख सात अपघातस्थळांवरील अतिक्रमण तातडीने हटविण्याचा निर्णय घेतला होता.

अतिक्रमण हटविण्यापूर्वी नगररचना विभागाने डिमार्केशन करणे गरजेचे होते. या संदर्भात अतिक्रमण विभागाने नगररचना विभागाला पत्र देताना डिमार्केशन करण्याची मागणी केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

दहा महिन्यांनंतर अतिक्रमण विभागाला अहवाल सादर झाल्यानंतर कारवाईला सुरवात झाली आहे. पंचवटी विभागीय अधिकाऱ्यांना अतिक्रमण विभागाने पत्र पाठवून तातडीने अतिक्रमण हटविण्याचा सूचना दिल्या.

सात प्रमुख सिग्नलवर पहिल्या टप्प्यात कारवाई

सर्वाधिक अपघात होणाऱ्या तारवाला सिग्नल, त्यानंतर मिरची चौक, निलगिरी बाग, नांदूर नाका चौक, जत्रा हॉटेल चौफुली, रासबिहारी चौक, बळी मंदिर चौक या सात सिग्नलच्या ठिकाणी असलेले अतिक्रमण पहिल्या टप्प्यात हटविले जाणार आहे.

त्या अनुषंगाने पंचवटी विभागीय अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणीसाठी भाजपचे प्रतिनिधी मतमोजणी केंद्रावर दाखल

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT