Water Crisis : ‘कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही. पीक आम्ही आमच्या आसवांवरच काढले’ या कवी यशवंत मनोहराच्या काव्यपंक्तीची ‘याचि देही याचि डोळा’ अनुभूती येवलेकर घेत आहेत.
पावसाळा संपण्यासाठी बोटावर मोजणेइतके दिवस शिल्लक असताना, आजही येथील बंधारे, विहिरी, नदी-नाले कोरडेठाक आहेत.
परिणामी, पावसाळ्यात टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढत असून, आजही ५० गावे-वाड्यांवर २३ टँकरने पाणीपुरवठ्याची वेळ आली आहे. पावसाळ्यात ही स्थिती असल्याने येणाऱ्या दिवसांचे काय, हा प्रश्न प्रत्येकाला सतावत आहे. (end of rainy season water source dry water shortage after drought at yeola nashik)
तालुका ब्रिटिशकालीन दुष्काळी असून, या वर्षी सुरवातीपासूनच पावसाने अवकृपा केली. परिणामी, मार्च-एप्रिलमध्ये सुरू झालेले टँकर आजही सुरूच आहेत. गंभीर म्हणजे, पावसाळा संपण्याच्या मार्गावर असताना, आतापर्यंत तालुक्यात फक्त २४४ मिलिमीटर (४५ टक्के) अल्प पाऊस झाला आहे.
तालुक्यातला एकही बंधारा, नदी-नाला वाहत नसल्याची गंभीर परिस्थिती आहे. वरवरच्या पावसाने खरिपाची पिके उभी दिसत असली, तरी जलस्रोत विहिरी, कूपनलिका कोरड्याच आहेत. किंबहुना मागील तीन-चार महिने सुरू असलेले बोअरवेल व विहिरींच्या भूजल पातळीत प्रचंड घट झाल्याने कोरडे पडून टंचाईत वाढ होत आहे.
तालुक्यात प्रत्येक उन्हाळ्यात ५० ते ७० गावे-वाड्या टँकरग्रस्त असतात. या वर्षी पावसाळ्यात हे चित्र आहे. मागील वर्षी सरतेशेवटी मुसळधार पाऊस झाल्याने फेब्रुवारी-मार्चपर्यंत जलस्रोतांना पाणी होते.
तरीही मार्चपासूनच टंचाईने डोके वर काढले होते. तालुक्यात अनकाई, खरवंडी, देवदरी दरवंडी, ममदापूर, आहेरवाडीसह १२ ठिकाणी मार्चपासून टँकरची मागणी होती, तर ११ एप्रिलला टँकर मंजूर झाले होते.
नंतर १८ एप्रिलला सुमारे १८ गावांना टँकर मंजूर झाले, तर ८ मेस तालुक्यातील दहावर गावांसह वाड्यावर टँकर मंजूर झाले होते. पावसाळा सुरू झाल्यावर १२ जूनला पाच गावांना टँकर सुरू करण्याची वेळ आली होती.
त्यानंतर टॅंकर सुरूच होते. आता पुन्हा एकदा टँकरची मागणी वाढू लागली असून, मातुलठाण व खैरगव्हाण येथे १ सप्टेंबरला, तर राजापूर येथे १० सप्टेंबरला टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
आताच असे, तर पुढे काय?
आजमितीला तालुक्यात १५ वाड्या व ३५ गावांना २३ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. या ५० ठिकाणी रोज ५२ खेपा टॅंकर पाणी पुरवितात. पावसाळा संपण्याच्या स्थितीत असताना, भयानक स्थिती असल्याने भविष्यकाळातील संकट अधिकच गडद असल्याची जाणीव शेतकऱ्यांसह प्रशासनाला होत आहे.
‘गणपती बाप्पा’ पावून मुसळधार पाऊस आला तर ठीक, अन्यथा पावसाळा नदी, नाले, बंधारे कोरडे ठेवूनच संपेल. परिणामी, पुढील जूनपर्यंत पाणी कसे पुरणार आणि जनावरांसह माणसांच्या पिण्याची पाण्याची गरज कशी भागविणार, हा मोठा प्रश्न आताच सतावत आहे.
पालखेडच्या पाण्याचा आधार!
तालुका दुष्काळी असल्याने नेहमी पाऊस कमी असतो. मात्र, धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडून पालखेड डाव्या कालव्याला सुटलेल्या ओव्हरफ्लोमुळे अनेकदा नदी-नाले भरून जातात. यंदा धरणातूनही ओव्हरफ्लोचे पाणी केवळ स्वप्न ठरले आहे.
मागील आठवड्यात चांगला पाऊस झाल्याने पालखेड डाव्या कालव्याला पाणी सुटले आहे. त्यातून पिण्याच्या योजनांना प्रथम पाणी दिले जाईल.
पाऊस उघडल्याने पाणी केव्हाही बंद होऊन शेतकऱ्यांच्या वाट्याला पाणी येण्याची शक्यता कमीच आहे. लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना शेती, पिण्यासाठी या पाण्याचा काहीअंशी फायदा होण्याची अपेक्षा आहे.
"अवर्षणप्रवण उत्तर-पूर्व भागात पिके पूर्णतः करपली असून, जलस्रोत कोरडे झाले. प्यायला पाणी मिळत नसल्याची स्थिती आहे. पाणीयोजना बंद पडल्याने टँकरशिवाय पर्याय उरलेला नाही. आजच पाण्याच्या शोधासाठी भटकंती सुरू असून, सरतेशेवटी मुसळधार पाऊस पडावा."
-सुभाष वाघ, माजी सरपंच, राजापूर
"मध्यंतरी आठ गावे-वाड्यांची संख्या कमी झाली होती. मात्र, पाऊस पुन्हा लांबल्याने टंचाई वाढत आहे. मागील आठवड्यात खैरगव्हाण, मातुलठाण राजापूर येथे टँकर सुरू झाले असून, सध्या कुठलाही प्रस्ताव शिल्लक नाही." -रफिक शेख, पाणीपुरवठाप्रमुख, पंचायत समिती, येवला
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.