tomato  esakal
नाशिक

Nashik Tomato Rates Hike: हंगामाच्या अखेरीला टोमॅटोच्या दराला लाली! दुबईसह आखाती देशात डंका

एस. डी. आहिरे

पिंपळगाव बसवंत : बंपर आवक होती, तेव्हा ५० रुपये क्रेट्‌सने विकला न जाणारा टोमॅटो हंगामाच्या अखेरीला दराची लाली चढली आहे.

सरासरी ५३२ रुपये प्रतिक्रेट्‌सने टोमॅटो आता भाव खाऊ लागला आहे. दीड महिन्यापूर्वी टोमॅटोचे पीक बाजारभावाअभावी उखडून टाकणाऱ्या शेतकऱ्यांवर आज पश्‍चातापाची वेळ आली आहे.

आवक घटण्याबरोबरच देशांतर्गत राज्याबरोबरच दुबईसह आखाती देशात नाशिकच्या टोमॅटोचा डंका वाजत आहे. त्यामुळे महिन्याभरापूर्वीच्या दराच्या तुलनेत दहापट टोमॅटोचे दर वधारले आहेत. (End of Season Tomato Rates Hike Danka in Gulf countries including Dubai nashik)

टोमॅटच्या दरात यंदा सेन्सक्सपेक्षा अधिक चढ उतार दिसले. प्रारंभी २० किलोच्या प्रतिक्रेट तीन हजार रुपये, असा सोन्याचा भाव टोमॅटोने खाल्ला.

अभुतपूर्व दरातील तेजी पाहून नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांनी टोमॅटो लागवडीचा धडाका लावला. त्यातून ऑक्टोबरमध्ये एकट्या पिंपळगाव बाजार समितीत दररोज तीन लाख क्रेट्‌सची आवक होत होती. त्यातच बंगरुळूमध्ये टोमॅटोचे स्थानिक पीक बाजारात दाखल झाले.

शिवाय केंद्र शासनाने नेपाळमधून टोमॅटो आयातीचे धोरण दराला ब्रेक लावणारे ठरले. टोमॅटोच्या दरात जोरदार घसरगुंडी होऊन तीन हजार रुपये क्रेटचे दर ५० रुपये क्रेटपर्यंत कोसळले.

शेतकऱ्यांनी टोमॅटोच्या शेतात सोडल्या शेळ्या-मेंढ्या

५० रुपये प्रतिक्रेट्‌समुळे वाहतूक व काढणी खर्चही वसूल होत नसल्याने शेतकरी हतबल झाले. टोमॅटो पिकाचा जुगार हरल्याची भावना शेतकऱ्यांची झाली. लागवडीसाठी आणलेली रोपे फेकनू दिली. उभ्या टोमॅटोच्या पिकांत शेळ्या-मेंढ्याना चरण्यासाठी सोडले.

सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होणारी उशीराची लागवड यंदा झाली नाही. त्यामुळे कधी नव्हे, ते नोव्हेंबरच्या मध्यावर आवकेत निम्म्याहून अधिक घट झाली. शेतकऱ्यावर सध्या पश्‍चातापाची वेळ आली आहे.

हरियाणा,पंजाब,उत्तर प्रदेश,बिहार येथुन मागणी वाढल्याने टोमॅटो खरेदीसाठी व्यापार्यांमध्ये जोरदार चढाओढ सुरू आहे. प्रतिक्रेट्‌स किमान १००, कमाल ७००, तर सरासरी ५३१ रुपये दर टोमॅटोला मिळत आहे. टोमॅटोच्या खरेदी-विक्रीतून दररोज साडेचार कोटी रुपयांची उलाढाल होत आहे.

आखाती देशात नाशिक जिल्ह्यातील टोमॅटो खाताेय भाव

बंगरुळूचा टोमॅटो हंगाम संपल्यात जमा आहे. देशासह आखाती प्रदेशात टोमॅटोची भिस्त एकट्या नाशिक जिल्ह्यावर आहे. पिंपळगाव बसवंत, गिरणारे, लासलगाव या ठिकाणच्या मार्केट यार्डात दिवसभरात एकूण दोन लाख क्रेट्‌सची आवक होत आहे.

त्यातील ५० हजार क्रेट्‌स दुबई, बांग्लादेश, ओमान, कुवेत या आखाती देशांत निर्यात होत आहेत. बांग्लादेशला ट्रकने चार दिवसांत, तर आखाती देशात जल वाहतूकमार्गे सातव्य दिवशी पिंपळगावचा टोमॅटो पोहोचत आहे. द्राक्ष, कांद्यापाठोपाठ पिंपळगावच्या टोमॅटोने परदेशी बाजारपेठ कवेत घेण्यास सुरवात केली आहे.

"आखाती देशांतून मागणी वाढल्याने टोमॅटोचे दर वधारले आहेत. बंगळुरुमध्ये आवकेत मोठी घट झाली आहे. दीड महिन्यापूर्वी दरातील पडझड झाल्याने शेतकऱ्यांनी टोमॅटोची नवीन लागवड तर केली नाही. शिवाय आहे ते पीक सोडून दिले. त्यामुळे आवकेत ६० टक्के घट झाली आहे. त्यामुळे दरात ही उसळी आली आहे."

- सोमनाथ निमसे, मातोश्री व्हेजिटेबल, पिंपळगाव बसवंत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yogi Adityanath : काँग्रेसमध्ये इंग्रजांचे ‘जिन्स’, पक्षाकडून जात, भाषेवरून देशात फूट : योगी आदित्यनाथ

Women’s Asian Champions Trophy: गतविजेत्या भारतीय महिला संघाचे घवघवीत यश; जपानवर मात करत गाठलं अव्वल स्थान

Priyanka Gandhi : भाजप सरकारचा महाराष्ट्राशी भेदभाव! प्रियांका गांधी यांचे गडचिरोलीतील सभेत टीकास्त्र

Sakal Podcast: मध्यमवर्गीयांना अच्छे दिन येणार ते पीएम मोदींना मिळाला 'ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ नायजर' पुरस्कार

Baramati Assembly constituency 2024 : बारामतीच्या सांगता सभांकडे राज्याचे लक्ष..!

SCROLL FOR NEXT