school esakal
नाशिक

इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा दोन दिवस संप

प्रशांत बैरागी

नामपूर (जि.नाशिक) : शासनाकडून मिळणाऱ्या सापत्नभावाच्या वागणुकीच्या निषेधार्थ सोमवार (ता. ५)पासून दोन दिवस सर्व शाळांचे ऑनलाइन शिक्षण बंद करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य इंग्लिश मीडियम स्कूल्स असोसिएशनने घेतला आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य इंग्रजी माध्यम शिक्षण महामंडळाचे निमंत्रक डॉ. प्रसाद सोनवणे यांनी ही माहिती दिली. (English-medium-schools-Strike-for-two-days-nashik-marathi-news)

शासनाचे लक्ष वेधण्यासाठी निर्णय

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दोन वर्षांपासून राज्यातील इंग्रजी शाळांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून शाळांनी अविरतपणे ज्ञानदानाचे कार्य सुरू ठेवले आहे. तरीही शासनाने काढलेल्या विविध मनमानी नोटिसा, अर्धवट शासन निर्णय, इंग्रजी शाळाविरोधी धोरण, गेल्या चार ते पाच वर्षांपासून रखडलेले आरटीई प्रतिपूर्ती अनुदान, सरकारी अधिकाऱ्यांचा मानसिक त्रास, शिक्षण विभागाचे मनमानी धोरण, शैक्षणिक फी वसुलीविरोधी धोरण, कोरोना संकटाचा शैक्षणिक क्षेत्रात सर्वाधिक फटका इंग्रजी माध्यमाच्या शाळांना बसला आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये ऑनलाइन शिक्षण सुरू असल्याने शिक्षकांचे पगार, प्रशासकीय खर्च, वाहनांच्या कर्जाचे हप्ते, फी भरण्यासाठी पालकांचा असणारा निरुत्साह आदी बाबींमुळे इंग्रजी माध्यमांच्या शालेय प्रशासनाला अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे. शासनाने शाळांबाबत सकारात्मक भूमिका न घेतल्यास आगामी पावसाळी अधिवेशनात कोअर कमिटीच्या माध्यमातून अनुदान प्रतिपूर्तीसह अन्य मागण्यांसाठी भीक मांगो, आक्रोश आंदोलनाच्या माध्यमातून आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाने लढा तीव्र करणार असल्याचे डॉ. सोनवणे यांनी म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT