Ayodhya Ram Mandir  esakal
नाशिक

Ayodhya Ram Mandir : अवघे मालेगाव भक्तिरसात चिंब; शोभायात्रेचा उत्साह लक्षवेधी

रामनाम की गुंज, रामधून, भजन, रामरक्षा यांसह विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे भक्तिरसात चिंब झाला होता.

सकाळ वृत्तसेवा

Ayodhya Ram Mandir : शहरातील कॅम्प, संगमेश्‍वर, कलेक्टर पट्टा, सोयगाव नववसाहत, भायगाव यांसह पश्‍चिम भाग रविवारी (ता. २१) रामनाम की गुंज, रामधून, भजन, रामरक्षा यांसह विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे भक्तिरसात चिंब झाला होता.

रविवारी पहाटेपासूनच या भागातील विविध मंदिरांमध्ये महाआरती, रामभजन व गाणी सुरू होती. (enthusiasm of procession is remarkable of ram in city nashik news)

सायंकाळी सकल हिंदू समाज व शिवसेना, युवासेनेचे नेते आविष्कार भुसे यांच्या पुढाकाराने भव्य शोभायात्रेला सुरवात झाली. शोभायात्रेच्या स्वागतासाठी कॅम्प मेन रोड व संगमेश्‍वर भागात रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. बहुसंख्य तरुण भगवे कुर्ते घालून शोभायात्रेत सहभागी झाले होते. शहरवासीय रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून शोभायात्रेचा आनंद लुटत होते.

शोभायात्रेचा मार्ग भगवे झेंडे, पताका, स्वागत कमानी, झालर, रोषणाई आदींनी सजला होता. कॅम्प रस्त्यावर श्रीराम-लक्ष्मण-सीता, छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर, बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पालकमंत्री दादा भुसे आदींसह शिवसेनेचे विविध नेते, राष्ट्रपुरुष, संत आदींचे फलक लक्ष वेधून घेत होते.

शोभायात्रेत श्रीराम रथ, अयोध्येतील मंदिराची प्रतिकृती, नंदीस्वार शंकर-पार्वती, महाबली हनुमान, अघोरी पथक, ढोल पथकाच्या निनादात तरुण नाचण्याचा आनंद लुटत होते. मर्दानी खेळाच्या पथकाने चित्तथरारक खेळ व कसरती सादर केल्या. कॅम्प मेन रोड, मोची कॉर्नर, एकात्मता चौक, कॅम्प रोड, मोसमपूल, महात्मा फुले रोड, संगमेश्‍वर या मार्गाने रामसेतूजवळील राममंदिरात शोभायात्रेची सांगता झाली. रस्त्यात ठिकठिकाणी शोभायात्रेचे स्वागत झाले.

स्वयंसेवी संस्थांनी मार्गावर पिण्याच्या पाण्याची सोय केली होती. शोभायात्रेत पालकमंत्री दादा भुसे, खासदार डॉ. सुभाष भामरे, प्रतापराव दिघावकर आदींसह सकल हिंदू समाजबांधव, शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

दरम्यान, संगमेश्‍वर सावता चौक भागातील श्रीराम मंदिरात सोमवारी (ता. २२) सकाळी सातला श्रीराममूर्ती महाभिषेक, सकाळी दहाला रामरक्षा, सायंकाळी दीपोत्सव, रात्री आठला महाआरती व महाप्रसाद, साडेनऊला भजनसंध्या होईल. स्मशान मारुती मळा मंदिर व भारत मंडळ व भवानी व्यायामशाळेतर्फे आतषबाजी झाली. काही मंदिरांमध्ये सुंदरकांड झाले.

वाके (ता. मालेगाव) येथील बाबादेव महाराज मंदिरानजीक मंदिरात श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा तीन दिवसांपासून सुरू आहे. अयोध्येतील रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याप्रसंगी सोमवारी साडेबाराच्या सुमारास या मंदिरात मूर्तींची प्राणप्रतिष्ठा होणार आहे.

नाभिक समाज संघटनेतर्फे आज कार्यक्रम

येथील समस्त न्हावी समाज मालेगाव ट्रस्ट, मालेगाव नाभिक समाज संघटनेतर्फे सोमवारी (ता. २२) सोयगाव मार्केटमधील श्री संत सेना महाराज विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सकाळी विष्णुयाग, होमहवन, रामनामजप, रामरक्षा, हनुमान चालिसा तसेच मंदिरातील गर्भगृहात महिरपचे अनावरण व ट्रस्टचा ७१ वा वर्धापन दिन साजरा होईल. दुपारी आरती, महाप्रसाद, भजन, तर सायंकाळी दीपोत्सव होईल, अशी माहिती नाभिक समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील सोनवणे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT