Nashik News : ठाणगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला १३ वर्ष काम केलेल्या उपक्रमशील शिक्षिका कल्पना माने यांना पूर्ण गावाने माहेरवाशीन, गावची कन्या म्हणून हृदयस्पर्शी जड अंतकरणाने निरोप दिला.
बालगोपाळ, आजी विद्यार्थी, गावचे पदाधिकारी, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. वयोवृद्ध महिला व माजी विद्यार्थिनींना अश्रू अनावर झाले. (entire village bade farewell to teacher Kalpana Mane with heavy hearts nashik news)
शिवाजी शेळके यांनी सौ. माने व श्री. माने यांनी गावातील विद्यार्थी घडवून प्रामाणिकपणे ज्ञानदानाचे काम केले. गावाला लक्ष्मीनारायण यांचा जोडा मिळाला, हे आमचे भाग्य समजतो, असे मत व्यक्त केले. सदस्य अर्जुन कव्हात यांनी ज्ञानदानाचे पवित्र काम करून शाळा नावारूपास आणल्याचे सांगितले.
बाजार समितीचे देविदास शेळके यांनी माने यांनी विद्यार्थी घडविल्याचे सांगिले. माजी सरपंच शिवाजी जाधव यांनी रडत रडत भावना व्यक्त केल्या. विष्णू कोंढरे यांनी माने मॅडमने खूप प्रामाणिक, निष्ठेने काम करून मुलांवर अतिशय संस्कार केल्याचे सांगितले. माजी विद्यार्थी ऋषिकेश महाराज यांनी आम्हाला बाप होऊन कठोर शिक्षाही दिली व प्रसंगी आई होऊन काळजात कुशीत घेऊन मायेची सावली दिल्याने आम्ही घडलो, असे सांगितले.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
अधिक मासमध्ये गावाने सन्मान करून राष्ट्रपती पुरस्कारापेक्षाही मोठा बहुमान सन्मान दिला, अशा अश्रूनयांनी सौ. माने यांनी भावना व्यक्त केल्या. मुख्याध्यापिका श्रीमती सविता शिरसाठ यांनी प्रास्ताविक केले.
केंद्रप्रमुख संतोष लोहकरे, शंकर शेळके, माजी सरपंच गणपत भवर, उपसरपंच कृष्णा कव्हlत, अर्जुन कव्हात, शिक्षिका रंजना मडके, श्री. सदगीर, लाजवंती कोकाटे, मुख्याध्यापक राजेंद्र वाघ, सुनील माने, अर्चना सपकाळे, शिक्षिका अर्चना वाघ, रामनाथ भडांगे, अनिल जाधव, सुनील जाधव, पांडुरंग कोढरे, किशोर शेळके, संपत शेळके, सोपान शेळके, मंदाबlई शेळके, कल्पना शेळके आदी उपस्थित होते. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विष्णू शेळके व उपाध्यक्ष योगेश भवर यांनी नियोजन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.