नाशिक : शहरातील उद्योजकांनी दुहेरी फायरसेस भरण्यास विरोध केल्यानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी (ता. १४) तातडीने नाशिकच्या अधिकाऱ्यांची मुंबईत बैठक घेत फायरसेसमधून उद्योजकांना दिलासा दिला आहे.
नाशिक महापालिकेने १ एप्रिलपर्यंत आवश्यक मुजंरी प्राप्त करून एमआयडीसीच्या ताब्यातील अग्निशमन केंद्र (फायर स्टेशन) ताब्यात घेण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. (Entrepreneurs will freed from double fire cess Testimony of Industries Minister Uday Samant Nashik News)
ही प्रक्रिया पूर्ण झाल्यास अंबड औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांची दुहेरी फायर सेसमधून सुटका होईल, असा विश्वास उद्योगमंत्र्यांनी या वेळी व्यक्त केला. अंबड औद्योगिक वसाहतीमधील अग्निशमन केंद्र महापालिकेकडे हस्तांतरित करण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
या वेळी एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन शर्मा, उद्योग विभागाचे विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह, उद्योग विभागाचे सहसचिव संजय देगावकर, उपसचिव श्रीकांत पुलकुंडवार, मुख्य अग्निशमन अधिकारी संतोष वारिके, एमआयडीसीचे मुख्य अभियंता सुभाष तुपे व नाशिक एमआयडीसी व महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
अंबड औद्योगिक वसाहतीतील फायर स्टेशनसाठी एमआयडीसी व महापालिकेकडून सेस वसूल करण्यात येतो. अग्निशमन केंद्र महापालिकेला हस्तांतरित करण्यात येईल, अशी ग्वाही उद्योगमंत्री सामंत यांनी नाशिक दौऱ्यादरम्यान दिली होती.
हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...
मंगळवारी त्याचा आढावा घेण्यात आला. एमआयडीसीच्या अग्निशमन केंद्राची किंमत वसूल करून ते महापालिकेला हस्तांतरित करण्याची प्रक्रिया महापालिकेने तत्काळ सुरू करण्याबाबत बैठकीत सूचना करण्यात आल्या. १ एप्रिलपासून ही प्रक्रिया पूर्ण करण्याची ग्वाही महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या वेळी दिली.
चार दिवसांत आयटी पार्कची जागा होणार निश्चित
नाशिक शहरात १०० एकर जागेवर आयटी पार्क उभारण्यात येणार आहे. त्यासाठी पुढील चार ते पाच दिवसांत जागा निश्चित करण्यात येणार असल्याचे उद्योगमंत्री सामंत यांनी म्हटले आहे.
तसेच अंबड एमआयडीसीलगत बंद टोल नाक्याजवळ नाशिक महापालिकेने ट्रक टर्मिनल्स विकसित करावे, एमआयडीसीदेखील आठ हजार चौरस मीटर भूखंडावर स्वतंत्र असे ट्रक टर्मिनल विकसित करेल, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.