wani gad ghat esakal
नाशिक

Navratri Festival : नवरात्र अन कावडयात्रेत सप्तशृंगी गडावर खाजगी वाहनांना प्रवेशबंदी

दिगंबर पाटोळे

वणी : श्री क्षेत्र सप्तश्रृंगी गड येथे १५ ते २४ ऑक्टोबर दरम्यान दरम्यान श्री सप्तशृंगी मातेचा शारदीय नवरात्रोत्सव तर २७ व २८ ऑक्टोबर रोजी कावड यात्रा (कोजागिरी पौर्णिमा उत्सव) साजरा होत आहे.

या कालावधीत वाहतूक कोंडी होवू नये व भाविकांची सुरक्षा व सोयीसाठी या कालावधी दरम्यान नांदुरी ते सप्तशृंग गड घाट रस्ता खाजगी वाहनांसाठी प्रवेश बंदी करण्यात आल्याची अधिसुचना अप्पर जिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांनी निर्गमित केली आहे. (Entry of private vehicles prohibited at Saptshringi Fort during Navratri festival and Kavadyatra nashik)

नवरात्रौत्सव कालावधीत सप्तश्रृंगी गडावर दर्शनासाठी भाविकांची फार मोठया प्रमाणावर गर्दी होते. गडावरील रस्ता घाटातून जात असून वळणा वळणाचा व अरुंद असल्याने वाहतुकीची कोंडी होते.

त्यामुळे प्रवाशांच्या व भाविकांच्या जिवीताला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाहतुकीची कोंडी होवु नये तसेच जनतेच्या सुरक्षा व सोयीच्या दिनांक 15/10/2023 ते 24/10/2023 पर्यंत तसेच दिनांक 26/10/2023 से 29/10/2023 कोजागिरी पौर्णिमा असल्याने, नांदुरी ते श्री सप्तश्रृंगी गडावर जाणाऱ्या भाडोत्री टॅक्सी, ऑटोरिक्षा व सर्व प्रकारच्या खाजगी चारचाकी व दुचाकी वाहनांना सप्तश्रृंगी गडावर जाण्यास प्रवेश बंदी करणे आवश्यक असल्याने शासन अधिसुचना एमव्ही / 0589/सीआर-1061/ टीआरओ-2 दि.19/05/1990 अन्वये मुंबई मोटार वाहन कायदा 1988 च्या कलम 115 प्राप्त अधिकाराचा वापर करुन अपर जिल्हादंडाधिकारी नाशिक राजेंद्र वाघ यांनी नांदुरी येथून श्री सप्तश्रृंगी गड येथे जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस वगळून इतर भाडोत्री टॅक्सी, ऑटोरिक्षा व सर्व प्रकारच्या खाजगी चारचाकी व दुचाकी वाहनांना ता. 15/10/2023 रोजीचे सकाळी 06.00 वाजेपासुन ते ता. 24/10/2023 रोजीचे रात्री १२ वाजेपर्यंत तसेच ता. 26/10/2023 रोजीचे सकाळी 06.00 वाजेपासून ते ता. 29/10/2023 रोजीचे रात्रीचे १२ वाजेपर्यंत श्री क्षेत्र सप्तश्रृंगी गड येथे जाण्यास प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे.

सदरचे निर्बंध हे परिस्थिती नुसार शिथिल करण्याचा व अचानक उद्भवणान्या परिस्थितीनुसार त्यात बदल करणेचा अधिकार राखुन ठेवण्यात येत असल्याचे तसेच या आदेशाचे उल्लंघन करणारे कायदेशीर कारवाईस पात्र राहाणार असल्याबाबतची अधिसुचना नाशिकचे अपर जिल्हादंडाधिकारी राजेंद्र वाघ यांनी निर्गमीत केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT