water crisis news esakal
नाशिक

Nashik News : साठवण तलाव भरूनही चार दिवसाआड पाणीपुरवठा; पाऊस लांबल्याचा फटका

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : अनेक घोषणा झाल्या; परंतु येवलेकरांची रोजच्या पाणीपुरवठ्याची स्वप्नपूर्ती वाऱ्यावरच आहे. किंबहुना आता पालखेड डाव्या कालव्याच्या आवर्तनाने शहराला पाणीपुरवठा करणारा साठवण तलाव तुडुंब भरून घेऊनही चार दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे.

तलावात पाणी आल्याने नगरपालिकेने एक दिवस कमी केला असून, हा अल्पसा दिलासा शहरवासीयांना मिळाला आहे. (Even after filling storage pond Water supply every four days Hit by prolonged rains Due to rotation arrival reduced by one day Nashik News)

अलनिनो वादळाच्या पार्श्‍वभूमीवर पाटबंधारे विभागाने फेब्रुवारी-मार्चमध्येच नगरपालिकेला पत्र देऊन पाणी जपून वापरण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यामुळे पालिकेने सुरवातीला चार दिवसाआड, तर मेच्या शेवटच्या आठवड्यात पाच दिवसात पाणीपुरवठा सुरू केला होता.

परिणामी नागरिकांना आठवड्यातून एकदाच पाणी मिळत आहे. त्यातच जूनच्या सुरवातीलाच शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टप्पा क्रमांक दोनच्या साठवण तलावाने तळ गाठल्याने पाणीटंचाईचे गडद संकट उभे राहिले होते. सुदैवाने याच काळात पालखेड डाव्या कालव्याला आवर्तन सुटल्याने पाणी पुरवठ्यात खंड पडला नाही.

मागील आठवड्यात शहराच्या पाणी योजनेचा साठवण तलाव सुमारे ३.७५ मीटर इतका भरून घेण्यात आला आहे. जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांनीदेखील तळ गाठल्याने व पाऊस लांबल्याने यापुढे केव्हा आवर्तन मिळेल याचा कुठलाही पत्ता नाही.

त्यामुळे उपलब्ध पाणी पाऊस पडेपर्यंत वापरावे लागणार असल्याने नगरपालिकेने एक दिवस कमी करून चार दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला. नागरिकांना वर्षभर तीन दिवसाआड पाणीपुरवठा होतो. तलाव भरल्याने तीन दिवसाआड पाणीपुरवठ्याची अपेक्षा होती.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मात्र, प्रशासनाचाही नाइलाज झाला असल्याने आठवड्यातून एकच दिवस पाणी मिळणार आहे. त्यामुळे काटकसरीने पाणी वापरावे लागत आहे. अनेकांना तर पाण्यासाठी शोधाशोध करण्याची वेळ येत असून, शहरातील निम्मे नागरिक जारचे पाणी घेत आहेत. जोरात पाऊस होऊन धरणातील साठा वाढला, तर आवर्तन मिळू शकणार आहे. त्यामुळे नागरिकांचे लक्ष पावसाकडे व ओव्हरफ्लोच्या आवर्तनाकडे लागले आहे.

"आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा होत असून, आज नळाला अतिशय गढूळ पाणी आले. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते. त्यातच नळाला पाणी आले की वीजपुरवठा खंडीत केला जातो. म्हणजे एका हाताने खाऊ घालायचे आणि दुसऱ्या हाताने बुक्के मारायचे. अशा परिस्थितीत नगरपालिका आणि महावितरणचा पाणी सोडण्याबाबत समन्वय असणे अत्यंत महत्त्वाचे आहे."

-मिलिंद पाटील, सामाजिक कार्यकर्ता, येवला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Elections: 'एम' फॅक्टरचा कौल MVAच्या बाजूने, सर्वात मोठ्या संघटनेच्या पाठिंब्यानं बळ वाढलं, महायुतीला टेन्शन

Mohammad Shami ने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी ठोकली दावेदारी; गोलंदाजीनंतर फलंदाजीतही दाखवली चमक

Goa Tourism : जाऊ फुलपाखरांच्या गावा! गोव्यात बटरफ्लाय कंझर्व्हेटरीला नक्की भेट द्या, फि,वेळ आणि ठिकाण जाणून घ्या सर्वकाही

Vinod Tawde : अजित पवारांना सोबत घेतल्याचे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी स्पष्टच सांगितले कारण...

Vinod Tawde: पुन्हा शरद पवार पावसात भिजले; भाजपचे तावडे म्हणाले, हा जिंकण्याचा 'भ्रम'...

SCROLL FOR NEXT