ZP Bharti Exam 2023 : जिल्हा परिषदेच्या वतीने विविध संवर्गासाठी पदभरती प्रक्रिया सुरू असून, त्याअंतर्गत विविध पदांसाठी परीक्षा सुरू झाल्या आहेत.
कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), कनिष्ठ अभियंता (विद्युत), वायरमन, फिटर व पशुधन पर्यवेक्षक या ६ संवर्गातील पदांसाठी आयबीपीएस कंपनीच्या वतीने विविध परीक्षा केंद्रांवर १५ व १७ ऑक्टोबरला ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेतली जाणार आहे. (Exam on 15th and 17th October for zp recruitment 6th cadre nashik news)
यासंदर्भातील जिल्हा परिषद पदभरतीचे वेळापत्रक व परीक्षा केंद्र यासाठीचे प्रकटन प्रसिद्ध करण्यात आले असून, नाशिक जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर हे प्रकटन उपलब्ध करून देण्यात आले आहे. सर्व परीक्षार्थींनी याबाबत नोंद घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
आयबीपीएस कंपनीच्या http://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php0appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04 या संकेतस्थळावरून विद्यार्थांना हॉलतिकीट उपलब्ध होणार आहेत.
विद्यार्थ्यांनी रजिस्टर केलेल्या मोबाईल नंबर व ई-मेल आयडीवर देखील हॉलतिकीटची लिंक पाठविण्यात आलेली आहे.
१५ ऑक्टोबरला होणाऱ्या परीक्षा : कनिष्ठ लेखाधिकारी (१०१ परीक्षार्थी), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) (९८ परीक्षार्थी), कनिष्ठ अभियंता (विद्युत) (६५ परीक्षार्थी).
१७ ऑक्टोबरला होणाऱ्या परीक्षा : वायरमन (३७ परीक्षार्थी), फिटर (६ परीक्षार्थी), पशुधन पर्यवेक्षक (७४७ परीक्षार्थी).
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.