Nashik ZP Bharti: महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषदेच्या वतीने विविध संवर्गासाठी पदभरती करण्यात येत आहे.
या जाहिरातीच्या अनुषंगाने शनिवारी (ता. ७) रिगमन (दोरखंडवाला), वरिष्ठ सहाय्यक (लेखा), रविवारी (ता. ८) विस्ताराधिकारी (सांख्यिकी) पदासाठी परीक्षा घेण्यात येणार आहे. (Exam tomorrow under Zilla Parishad recruitment nashik news)
रिगमन (दोरखंडवाला) या पदाठी १७, वरिष्ठ सहाय्यक (लेखा) ७६२ परीक्षार्थींची परीक्षा होणार आहे. शनिवारी विस्ताराधिकारी (सांख्यिकी) पदासाठी एक हजार २८१ परीक्षार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट होणार आहेत.
जिल्हा परिषद गट क भरतीप्रक्रिया परीक्षेच्या पूर्वतयारीचा जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी आढावा घेतला. गुरुवारी (ता. ५) मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी सर्व व्हेन्यू ऑफिसर, परीक्षेशी संबंधित सर्व अधिकारी व कर्मचारी यांची बैठक घेऊन सूचना दिल्या. त्याचबरोबर त्यांनी परीक्षा केंद्रांना देखील भेटी दिल्या.
आयबीपीएस कंपनीच्या वतीने शुक्रवारी (ता. ६) सकाळी १० ते दुपारी १२ दरम्यान सर्व व्हेन्यू ऑफिसर व संबंधित अधिकारी यांना प्रशिक्षण देण्यात आले. जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात टेस्ट सेंटर ॲडमिनिस्ट्रेशन यांची एकत्रित बैठक झाली. बैठकीत परीक्षेच्या पूर्वतयारीचा आढावा घेऊन उपस्थित अधिकारी व परीक्षेशी संबंधित यंत्रणेला सूचना देण्यात आल्या.
यामध्ये परीक्षा केंद्रांवर कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार आढळल्यास तत्काळ गुन्हे दाखल करण्याचा निर्देश मित्तल यांनी दिले. प्रत्येक परीक्षा केंद्रावर पोलिस बंदोबस्त पुरविण्यासाठीचे पत्र शहर पोलिस आयुक्त व पोलिस अधीक्षक (ग्रामीण) यांना देण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थितीत प्रत्येक परीक्षा केंद्रावर रुग्णवाहिका व आरोग्य पथक तैनात करण्यात आले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.