NMC News : स्मार्टसिटी कंपनीला शहरात रस्ते खोदताना हद्द निश्चित करून दिली आहे. मात्र त्या हद्दी बाहेर अर्थात संरेषेबाहेर रस्ते खोदण्यात आल्याने स्मार्टसिटी कंपनीला रस्ते खोदण्याचे कामे रद्द करण्याचे पत्र बांधकाम विभागाकडून देण्यात आले आहे. स्मार्टसिटी कंपनीच्या माध्यमातून शहरात मोठ्या प्रकारची रस्ते खोदकाम सुरू आहे.
आत्तापर्यंत 196 पैकी 92 रस्त्यांचीच कामे पूर्ण झाली आहे, तसे पाहता स्मार्टसिटी कंपनीची मुदत संपुष्टात येत असल्याने त्यापूर्वीच काम होणे अपेक्षित आहे. परंतु तब्बल तीन वेळा रस्ते खोदकाम करणाऱ्या कंत्राटदार कंपनीला स्मार्टसिटी कंपनीकडून मुदत देण्यात आली आहे. (Excavation of roads outside fixed line work of Smart City Company canceled by Municipal Corporation NMC News)
आता शासनाने स्मार्टसिटी कंपनीची मुदत एक वर्षासाठी वाढवली आहे. परंतु एक वर्षासाठी मुदत वाढवत असताना दुसरीकडे नव्या कामाची निविदा काढू नये, अशादेखील सूचना दिल्या आहेत.
परंतु असे असताना स्मार्टसिटी कंपनीकडून पेठ रोडच्या 75 कोटी रुपयांच्या कामासाठी निविदा काढण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे स्मार्टसिटी कंपनीचा हा अतिरेकी हस्तक्षेप करणारा ठरत असल्याने महापालिकेने आता अधिकाराचे अस्त्र उगारले आहे.
यापूर्वी आमदार ॲड. राहुल ढिकले यांनीदेखील पंतप्रधान कार्यालयाकडे स्मार्टसिटी कंपनीच्या कामकाजाची तक्रार करण्याचा इशारा दिला आहे. त्या पाठोपाठ आता महापालिकेने कठोर भूमिका घेत स्मार्टसिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे यांना पत्र लिहून कामे रद्द करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
समन्वयाचा अभाव
शहरात रस्त्याची कामे करताना महापालिकेच्या बांधकाम विभागाने संरेषा मंजूर केली आहे. त्या रेषेच्या बाहेर स्मार्टसिटी कंपनीकडून खोदकाम करण्यात आली आहे.
यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान तर झाले आहेच, त्याशिवाय नागरिकांनादेखील मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. कुठलेही काम करताना महापालिकेच्या बांधकाम विभागाशी समन्वय साधने गरजेचे आहे.
परंतु स्मार्टसिटी कंपनीकडून कुठल्याही प्रकारचा समन्वय साधला गेला नाही. त्यामुळे अखेरीस शहरात सध्या सुरूच असलेली रस्ते खोदकाम बंद करण्याचे पत्र देण्यात आले आहे.
"रस्ते खोदायची संरेषा निश्चित करण्यात आली आहे. त्याबाहेर खोदकाम करायची असेल तर महापालिकेच्या अभियंत्यांची परवानगी घेणे गरजेचे आहे. मात्र अशा कुठल्याही परवानगी न घेता खोदकाम होत असल्याने कामे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे."
- शिवकुमार वंजारी, शहर अभियंता, महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.