water shortage sakal
नाशिक

Water Scarcity : अल निनोच्या धसक्याने यंदा 30 दिवसांसाठी जादा पाणीकपात!

सकाळ वृत्तसेवा

Water Scarcity Nashik : पंतप्रधान कार्यालयाकडून आलेल्या अल निनो (El Nino) वादळामुळे पाऊस लांबण्याच्या अंदाजानंतर जिल्ह्यातील यंत्रणा सतर्क झाली आहे. (Excess water reduction for 30 days due to el nino nashik news)

या नियोजनाचा भाग म्हणून यंदा जुलैअखेरऐवजी ऑगस्टअखेरपर्यंत पाणी नियोजन करण्यात आले आहे. नव्या ३० दिवस लांबलेल्या नियोजनाचा जिल्ह्यातील सिंचन व औद्योगिक पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे.

पालकमंत्री दादा भुसे यांनी शनिवारी (ता.८) नाशिक जिल्ह्यातील पाणीटंचाईची आढावा बैठक घेतली. त्यात यंदा पंतप्रधान कार्यालयाने अल निनो वादळ, तापमानवाढीसह पाऊस लांबण्याचा अंदाज वर्तविला आहे.

त्या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीला महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, उप वनसंरक्षक पंकज गर्ग, जिल्हा परिषदेचे सहाय्यक कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, अपर जिल्हाधिकारी माया पाटोळे, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता सागर शिंदे आदींसह विविध विभागांचे अधिकारी होते.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

पिण्याला प्राधान्य

बैठकीत पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्याचे ठरले. जिल्ह्यातील जो पाणीसाठा जुलैअखेरपर्यंत ९० दिवस वापरायचा होता, तो यंदा ऑगस्टअखेरपर्यंत म्हणजे १२० दिवस वापरावा लागणार आहे. परिणामी, ३० दिवसांसाठी जादा पाणीकपात करावी. सिंचन आणि उद्योगाच्या आर्वतनाऐवजी पिण्याच्या पाण्याला प्राधान्य द्यावे.

टंचाईच्या पार्श्वभूमीवर रोजगार हमीची कामे तयार ठेवावी. कूपनलिकांची दुरुस्ती, विंधनविहीर यांचे नियोजन करावे. वाढत्या उन्हात तापमान वाढल्यास शाळांच्या वेळांचे फेरनियोजन करणे, प्रत्येक आठवड्यात टंचाई आढावा बैठक घेतल्या जाव्यात. जिल्हास्तरावरील प्रांताधिकाऱ्यांनी तालुकानिहाय बैठका घ्याव्यात. ग्रामपंचायत सदस्यांपासून तर खासदारांपर्यंतच्या सगळ्या लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन त्यांच्या सूचना घ्याव्यात, आदी सूचना दिल्या.

कालावधी वाढविण्याचे नियोजन

महापालिकेने पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर आठवड्यातून एक दिवस पाणीकपातीची तयारी दर्शविली. नांदगावला सातऐवजी एक दिवस वाढविण्याचे ठरले. मनमाडला १८ ऐवजी ११ दिवसांनी कपात करावी. इगतपुरी दोन दिवसांनी पाणीपुरवठा करावा. चांदवडला दोन आणि तीन दिवसांचा, कळवणला रोज पाणीपुरवठा आहे.

त्याऐवजी आठवड्यात एक दिवस कपात, देवळ्यात दोन दिवसांची, निफाडला दोन दिवस, सुरगाण्याला बुबळीतून होणारा पाण्याचा कालावधी वाढवावा. पेठला शिरोळे बंधाऱ्यातील कपात कालावधी वाढवावा. दारणेतून होणारे बिगर सिंचनाच्या आवर्तनाचा फेरनियोजन करावे.

- चार महिन्यांत धरणात १४ टक्के बाष्पीभवन

- अल निनोने एक डिग्री तापमानवाढीची भीती

- २,५०० एमसीएफटी पाण्याचे होणार बाष्पीभवन

"पाण्याचे नियोजन करण्याची जबाबदारी सगळ्यांचीच आहे. अन्न, पशुसंगोपन, चार, रोजगार हमीसह पाण्याची बचत करावी लागणार आहे. तास आणि मिनिटांचा विचार करून नियोजन केले तरी ते शक्य आहे. काही तास काही मिनीट पाणी कमी करीत गेले तरी महिनाभराहून अधिक ऑगस्टपर्यंत पाणी वाचविणे शक्य आहे." - दादा भुसे, पालकमंत्री, नाशिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पारा घसरला; आजपासून थंडीचा जोर वाढणार

Rahul Gandhi : मोदींचा डोळा राज्याच्या संपत्तीवर...राहुल गांधी यांचा भाजपवर घणाघात

Anil Deshmukh: अनिल देशमुखांवर हल्ला कसा झाला, नेमकं काय घडलं? हल्लेखोर देत होते भाजप जिंदाबादच्या घोषणा? मोठा रिपोर्ट समोर

Sakal Podcast: युक्रेनला क्षेपणास्त्र वापरण्याची अमेरिकेनं दिली परवानगी ते बाबा सिद्दीकी हत्येतील मास्टरमाईंडला अटक

थंडीत उर्जा रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी आहारात काय असावे? ‘हे’ ७ पदार्थ आहारात ठेवा, होतील फायदेच फायदे

SCROLL FOR NEXT