The natural light of Kajwa is soothing to the mind esakal
नाशिक

Kajwa Festival 2023 : लक्ष लक्ष दिव्यांनी तारांगण अवतरले भूतलावरी! काजवा महोत्सवाची धूम

भंडारदरा, घाटघर, कळसूबाई, मुरशेत परिसरात पर्यटकांची वाढती गर्दी, आदिवासींना रोजगार

विजय पगारे

Kajwa Festival 2023 : निसर्गाचे भरभरुन वरदान लाभलेल्या नाशिक आणि नगर या दोन जिल्ह्याच्या सरहद्दीवरील कळसूबाई, भंडारदरा व घाटघर परिसरात काजवा महोत्सवाला दमदार सुरुवात झाली आहे. रोज शेकडोंच्या संख्येने पर्यटक काजवा महोत्सव बघण्यासाठी गर्दी करत आहेत.

ग्रीष्म ऋतू संपतो न संपतो तोच वर्षा ऋतूच्या स्वागतासाठी निसर्ग देवता जणू काजव्यांच्या रुपात धर्तीवर अवतरलीय की काय असा विचार मनात चमकून जावा, गगनातील तारांगण जणू भूतलावर उतरल्याचा भास येथील महोत्सवा निमित्त काजव्यांचा दुनियेत येते.

भंडारदरा, घाटघर, मुरशेत, कळसूबाई परिसरात पावसाळ्यातील जलोत्सव, ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये फुलोत्सव आणि मे अखेर व जून महिन्याच्या सुरुवातीला पंधरवाड्यात हजारो झाडांवर काजव्यांची ही अनोखी दुनिया अवतरते.

कळसूबाई शिखराच्या पायथ्याशी असलेल्या घाटघर, उडदावणे, पांजरे, मुरशेत, मुतखेल, कोलटेम्भे, भंडारदरा, चिंचोंडी, बारी या खेड्यांच्या शिवारात आणि रंधा धबधब्याजवळील परिसरातील झाडे लक्षावधी काजव्यांनी उजळून निघतात. हिरडा, बेहडा, सादडा, जांभूळ, आंबा, उंबर अशा निवडक झाडांवरच काजव्यांचा हा काही दिवसांचा अद्भुत खेळ चालतो.

मर्यादा पाळण्याचे आवाहन

यावर्षी काजवा महोत्सव १५ मे पासून वनविभागामार्फत जाहीर करण्यात आला होता. मात्र काजवे दिसण्याचे प्रमाण अत्यल्प असल्याने पर्यटकांचा भ्रमनिरास झाला होता.

आता मात्र काजव्यांची चमचम मोठ्या मोठया प्रमाणात दिसून येत असल्याने भंडारदरा परिसरात खऱ्या अर्थाने काजव्यांची चाहूल लागल्याचे दिसते. काजवा महोत्सवात होणारी पर्यटकांची गर्दी पाहता भंडारदरा परिसरातील हॉटेल व्यवसायिक सज्ज झाले आहेत.

नियमांचे पालन करून काजवा महोत्सवाचा आनंद घ्यावा असे आवाहन नाशिक विभागाचे सहाय्यक वन संरक्षण अधिकारी गणेश रणदिवे यांनी केली आहे.

दरवर्षी काजवा महोत्सवाच्या निमित्ताने भंडारदरा परिसरात जवळपास पन्नास ते साठ लाखांची उलाढाल होत असते. काजव्यांचे तारांगण बघण्यासाठी येणारे पर्यटक येथे जांभूळ, आवळा, करवंदे, आंबा, जांभुट्या, आंबळे, शेंगा आदी रानमेव्याचा आस्वाद घेत काजव्यांचा आनंद घेतात.

यातून स्थानिक आदिवासी बांधवांना रोजगार उपलब्ध होत आहे. परिसरातील दहा ते पंधरा हॉटेल, रेस्टॉरंट, घरगुती खानावळी यांचा मोठा व्यवसाय होत असतो.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सांस्कृतिक महोत्सवाची मेजवानी

महाराष्ट्र पर्यटन संचलनालयाकडून काजवा प्रेमीसाठी दरवर्षी सांस्कृतिक मेजवानी आयोजित केली जाते.भंडारदरा पर्यटन संचलनालयाकडून दोन दिवसीय उपक्रम राबविण्यात येत असतो. भंडारदरा वनपरिक्षेत्रातील पांजरे,गावठा, मुरशेत परिसरात बोहडा,आदिवासी नृत्य या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

येथील शेंडी वन तपासणी नाक्यावरून पर्यटकांना वन्यजीव विभागाचे प्रवेश शुल्क भरून प्रवेश करत अभयारण्यातील पांजरे गावठापर्यंत पोहचावे लागणार आहे.येथील महसुली क्षेत्रात स्थानिक आदिवासी लोकांनी उत्पादित व स्वतः निर्मित केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन देखील करण्यात आले होते.

काळा तांदूळ,हात सडीचा तांदूळ,नागली,वरई विविध भरड धान्य आणि बांबू हस्तकलेपासून तयार केलेल्या विविध शोभेच्या वस्तूही पर्यटकांना खरेदी करता येणार असल्याचे संचलनालयाने दिलेल्या पत्रकात म्हंटले होते.

"यंदा काजवा महोत्सवासाठी पर्यटकांची तोबा गर्दी पाहायला मिळत आहे. रात्री साडेनऊ नंतर अभयारण्य क्षेत्रात प्रवेश दिला जात नसून दहानंतर पर्यटकांना अभयारण्य परिसरात फिरता येणार नाही. ठिकठिकाणी पर्यटक व त्यांच्या वाहनांची तपासणी करण्यात येत आहे."

- गणेश रणदिवे, सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी, वन्यजीव वनविभाग, नाशिक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Result 2024: एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांचं काय झालं? महाराष्ट्राचा कल काय सांगतोय? जाणून घ्या

Maharashtra Assembly Results: लाडकी बहीण पावली! महायुतीला 'एक हे तो सेफ हे'ची जोड अन् झटक्यातच मविआचा हिरमोड

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: पुन्हा निवडणुका घ्या, हा जनमताचा कौल नाही - संजय राऊत

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

SCROLL FOR NEXT