Provide Oxygen Cylinder to Small Child in Train esakal
नाशिक

Exclusive News : नाशिकच्या कार्यकर्त्यांची 13 महिन्याच्या चिमुरड्यासाठी माणुसकी

विनोद बेदरकर

नाशिक : रेल्वेगाडीला उशीर झाल्याने कोलकत्याहून मुंबईला उपचारासाठी चाललेल्या १३ महिन्याच्या बाळाचा ऑक्सिजन संपण्याची वेळ येते. रात्री अशा अडचणीच्या स्थितीत रेल्वे प्रशासनाकडून ऑक्सिजन सिलेंडर मिळत नसतांना नाशिकच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी वेळेत ऑक्सिजन सिलेंडर पुरवित माणुसकीचे दर्शन घडविले.

गुरुवारी (ता. 3) मध्यरात्री मध्य रेल्वेच्या मार्गावर नाशिक रोड परिसरात काल हा प्रकार घडला. कोलकत्ता येथील एका १३ महिन्याच्या बाळाला मुंबईला उपचारासाठी रेल्वेने नेले जात होते. मात्र रेल्वेगाडी ७ तास उशीर झाल्याने सिलेंडरमधील ऑक्सिजन संपला. मुंबईत चिमुरडा पोहोचेल का अशी अडचणीची स्थिती उद्भवली. पण नाशिकमधील दीपक डोखे आणि शिवा गायधनी यांच्या तत्परतेमुळे धावत्या रेल्वेतील चिमुरड्याला वेळेत प्राणवायू मिळाला.

इंदिरानगर येथील त्याच रेल्वेने प्रवास करणाऱ्या भूषण जैन यांनी सेवाग्राम एक्सप्रेस मधून सामाजिक कार्यकर्ते दीपक डोखे यांच्याशी संर्पक साधून मध्यरात्री धावत्या रेल्वेतील चिमुकल्या बाळाला ऐनवेळी ऑक्सिजन हवा असल्याचे सांगितले. श्री डोखे यांनी तात्काळ जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांच्याशी संर्पक साधून सिलेंडरच्या बदल्यात सिलेंडर देण्याची तयारी दर्शवित ऑक्सिजनसाठी मागणी केली. डॉ. थोरात यांनी ऑक्सिजन देण्याची सोय केली.(Exclusive Story Humanity of Nashik activists for a 13 month old child provide oxygen cylinder in train Nashik News)

वेळेचे गणित महत्वाचे

रेल्वे मनमाडहून मुंबईच्या दिशेने जात होती. रेल्वे गाडी नाशिक रोडला येईपर्यंत सिलेंडरची सोय करुन, ते सिलेंडर घेउन रेल्वेस्थानकापर्यत पोहोचवितांना जिल्हा रुग्णालयाचे सिलेंडर तसेच ते पोहोचविण्यासाठी रुग्णवाहिका गरजेची होती. नाशिक रोड भागातील माजी नगरसेविका शोभा गायधनी यांचे पुत्र शिवा गायधनी यांनी रुग्णवाहिका पुरवित वेळेत सिलेंडर पोहोचवण्याचे गणित जुळविले. एकाचवेळी नाशिक जिल्हा रुग्णालय आणि दुसरीकडे नाशिक रोड अशा दोन्ही भागातून यंत्रणा कार्यरत झाल्याने त्या चिमुकल्याला वेळेत रात्री रेल्वे डब्यात सिलेंडर मिळला. परिणामी, आज शुक्रवारी (ता. 4) सकाळी मुंबई वाडिया रुग्णालयात संबधित बाळावर उपचार करणे शक्य झाले.

अवघ्या तेरा महिन्याच्या बाळावर गळ्यात नाजूक स्वरुपाची शस्त्रक्रियेसाठी कोलकत्याहून प्राथमिक तयारी करुन निघाले. मात्र रस्त्यात रेल्वेगाडीला उशीरा झाल्याने त्यांच्याकडील सिलेंडरमधील ऑक्सिजन संपला. मध्यरात्री उद्भवलेल्या या प्रकारात प्रशासनाने मदत करायला हवी होती मात्र रेल्वे प्रशासनाने हतबलता दाखविली.

"पण नाशिकच्या दीपक डोखे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रयत्नामुळे चिमुरड्यावर वेळेत उपचार शक्य झाले." - डॉ हितेश बुऱ्हडे (रेल्वेतील सहप्रवाशी)

"रेल्वेला सात तास उशीर झाल्यामुळे त्या बाळाच्या पालकांवर ऑक्सीजनसाठी वणवण करण्याची वेळ आली.रेल्वे प्रशासनाकडून अशा वेळी सिलेंडरची सोय होण्याची गरज होती. पण ते शक्य झाले नाही. नेमक्या त्याच गाडीतून प्रवास करणाऱ्या भूषण जैन यांनी मला दूरध्वनी केल्यामुळे मला ही बाब समजली. यात शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, शिवा गायधनी यांच्यासह अनेकांचे प्रयत्न कामी आले. कोलकत्याच्या १३ महिण्याच्या बाळाला नाशिकमधून योग्य वेळी मदत झाल्याचे समाधान आहे." - दीपक डोखे (सामाजिक कार्यकर्ते)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : राहुल गांधी यांनी दोन डिसेंबरला न्यायालयात हजर राहावे; पुणे प्रथमवर्ग न्यायालयाचा आदेश

Pune News : मविआच्या काळात महाराष्ट्राच्या विकासाचा वेग मंदावला; केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत

IPL Auction साठी पर्थ कसोटीवेळीच 'हा' कोच संघाला सोडणार अन् ऑस्ट्रेलियातून सौदी अरेबियात पोहचणार

Paranda Assembly Election : महाराष्ट्राच्या विधानसभेमधून निधी आणण्यासाठी धमक लागते - प्रा. डॉ. तानाजी सावंत

Parli Assembly constituency 2024 : परळी विधानसभेच्या इतिहासात पहिल्यांदाच: ना सभा,ना रँली गाठीभेटीने संपला परळी विधानसभेचा प्रचार

SCROLL FOR NEXT