NMC latest marathi news esakal
नाशिक

नाशिक : दायित्व कमी करताना विभागांची कसरत; आज अखेरची मुदत

विक्रांत मते

नाशिक : अतिरिक्त खर्च झाल्याने महापालिकेचे (NMC) दायित्व कमी करण्यासाठी यापूर्वी प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. असे असले तरी अद्यापही कार्यारंभ आदेश दिलेली कामे ‘ईआरपी’ मधून हटविण्यासाठी दिलेली अंतिम मुदत शुक्रवारी (ता. १५) संपुष्टात येत असल्याने विविध कामांना कात्री लावण्यासाठी विभागप्रमुखांची मोठी कसरत सुरू आहे.

दरम्यान, बांधकाम विभागाकडे (PWD) प्रशासकीय मान्यतेसाठी दाखल झालेल्या जवळपास अडीचशे कामे रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. (Exercise of all departments while reducing liability Deadline today Nashik nmc Latest Marathi News)

गेल्या दोन वर्षात मोठ्या प्रमाणात विशिष्ट कामांवर खर्च झाला. त्या व्यतिरिक्त स्थायी समिती व महासभेने जवळपास ६०० ते ७०० कोटींची अतिरिक्त कामे यंदाच्या अंदाजपत्रकात गृहीत धरल्याने महापालिकेचा दायित्वाचा भार तब्बल २८०० कोटींवर गेला.

मात्र, उत्पन्न जवळपास बाराशे ते तेराशे कोटी रुपये असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात कामांचे दायित्व महापालिकेला परवडणारे नाही. त्यामुळे महापालिका आयुक्त रमेश पवार यांनी कार्यभार हाती घेतल्यानंतर दायित्व कमी करण्याचा निर्णय घेतला. दायित्व कमी करताना कामांचे नियोजन करण्यात आले.

अधिक गरजेचे असलेल्या कामाव्यतिरिक्त तूर्त अनावश्यक कामांना कात्री लावण्याच्या सूचना देण्यात आल्या. कामे मंजूर करताना ‘ईआरपी’ मधील अनावश्यक कामांची यादी मागविण्यात आली होती. सदरची कामे संगणकामधून काढण्याच्या सूचना दिल्या होत्या. दायित्व कमी करण्यासाठी प्रत्येक विभागाला तारीख ठरवून देण्यात आली.

वैद्यकीय विभाग वगळता सार्वजनिक बांधकाम, घनकचरा व्यवस्थापन, विद्युत व यांत्रिकी, उद्यान, अतिक्रमण, स्लम, छपाई, कर, सुरक्षा या विभागांना १५ जुलैपर्यंत ईआरपीमधून कामे रद्द करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार शुक्रवारी कामे रद्द करण्याची अंतिम मुदत असल्याने विभागांची मोठ्या प्रमाणात कसरत होत आहे. वैद्यकीय विभागासाठी २० जुलै अंतिम मुदत देण्यात आली आहे.

मान्यता नसल्याने कामे रद्दचा निर्णय
महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मोठ्या प्रमाणात नगरसेवकांच्या लेटरहेडवर कामे सादर करण्यात आली आहे. परंतु या कामाचा अंदाज पत्रकात समावेश नाही. प्रशासकीय मान्यतादेखील नसल्याने कामे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बांधकाम विभागाकडे जवळपास अडीचशे कामांना कात्री लागल्याची माहिती समोर आली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : हेलिपॅडवर बॅग तपासणीसाठी कुणी पुढं आलं नाही, उद्धव ठाकरे म्हणाले- आज मला.....

Latest Maharashtra News Updates : पोलिस असल्याच्या बहाण्याने सराफाची फसवणूक

सुबोध-तेजश्रीचे जुळले सूर ; बहुप्रतीक्षित हॅशटॅग तदैव लग्नम सिनेमाचा पहिला टीझर प्रेक्षकांच्या भेटीस

Dev Diwali 2024: देव दिवाळी का साजरी केली जाते? वाचा इतिहास अन् धार्मिक महत्व

Supriya Sule In Nashik : कांद्याला हमीभाव मिळवून देणार; खासदार सुप्रिया सुळे यांची चांदवडच्या सभेत ग्वाही

SCROLL FOR NEXT